अशोक घोडके यांजकडून…
गोतोंडी(वार्ताहर): साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या 101 व्या जयंतीचे औचित्य साधून 15 ऑगस्ट रोजी इंदापूर या ठिकाणी कोरोना काळातील उल्लेखनीय कामगिरी बजावणार्या सर्व क्षेत्रातील मान्यवरांचा गुणगौरव बहुजन परिषद महाराष्ट्र राज्य यांकडून करण्यात येणार आहे.
इंदापूर तालुक्यातील सर्व शासकीय, निमशासकीय आणि सामाजिक क्षेत्रामध्ये ज्यांनी उल्लेखनीय कार्य केले आहे.विशेषतः गेल्या दीड वर्षाच्या कालावधीमध्ये कोरोनाच्या काळात माणुसकीचे नाते जिवंत ठेवण्याचे काम केले आहे अशांचा गुणगौरव 15ऑगस्ट रोजी इंदापूर येथील गुरुकृपा सांस्कृतिक भवन या ठिकाणी आयोजित करण्यात आला आहे.
कोरोना काळात सामाजिक जबाबदारी या नात्याने जीव धोक्यात घालून ज्यांनी लोकांची मदत केली,सेवा दिली अशा 101 विशेष अतिथींना पुरस्कार प्रदान करण्यात येणार असल्याची माहिती संघटनेचे अध्यक्ष बिभीषण लोखंडे यांनी दिली.
यावेळी संघटनेचे सचिव विजय गायकवाड, कार्याध्यक्ष दत्ता बाबर,प्रहार जनशक्ती संघटनेचे तालुकाध्यक्ष संजय राऊत, बहुजन परिषदेचे राज्य संघटक संजय कुचेकर इ.उपस्थित होते.