बारामती(वार्ताहर): जिल्हा न्यायालय बारामती येथील तालुका विधी समिती व वकील बार असोसिएशन यांच्या संयुक्त विद्यमानाने रविवार दि.1 ऑगस्ट 2021 रोजी सकाळी 10.30 वा. राष्ट्रीय लोकअदालतीचे आयोजन करण्यात आले असल्याचे तालुका विधी सेवा समितीचे अध्यक्ष यांनी एका पत्रकाद्वारे कळविले आहे.
या लोकअदालतीमध्ये बँकांकडील वसुली, विद्युत देयके, कौटुंबिक प्रकरणे, मोटार अपघात, न्यायालयातील प्रलंबित प्रकरणे व दाखल केलेली नाहीत अशा थकबाकीदारांची दखलपूर्व प्रकरणे (झीशश्रळींळसरींळेप लरीशी) तडजोडीने मिटविणेसाठी राष्ट्रीय लोकअदालतमध्ये ठेवण्यात येणार आहेत.
तरी तालुक्यातील तमाम नागरीकांनी या संधीचा फायदा घेऊन आपल्या न्यायालयातील दाखलपूर्व व प्रलंबित प्रकरणांचा तडजोडीने निकाल करून घ्यावा असेही आवाहन वकील बार असोसिएशनचे अध्यक्ष ऍड.चंद्रकांत सोकटे यांनी केले आहे.