बारामती(वार्ताहर): येथील प्रभाग क्र.13अ चे नगरसेवक सत्यव्रत अर्जुनराव काळे हे गरज पाहुन वस्तुंचे वाटप करणारे नगरसेवक असल्याचे उपस्थित मान्यवरांनी बोलताना सांगितले.
राज्याचे उपमुख्यमंत्री ना.अजित पवार यांच्या 62 व्या वाढदिवसानिमित्त आई प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष व बारामती नगरपरिषदेचे बांधकाम समितीचे सभापती सत्यव्रत काळे यांच्या वतीने गरजुंना वाफ घेण्याची मशिन (स्टिमर) व साड्यांचे वाटप करण्यात आले.
या कार्यक्रमास बारामती बँकेचे चेअरमन श्रीकांत सिकची, राष्ट्रवादी कॉंग्रेसचे शहर उपाध्यक्ष सिद्धनाथ भोकरे, नगरसेवक नवनाथ बल्लाळ, संतोष जगताप, पं.स.माजी गटनेते दिपक मलगुंडे, मुस्लीम बँकेचे संचालक आलताफ सय्यद, सामाजिक कार्यकर्ते पांडुरंग चौधर, निलेश मोरे, सत्यजित काटकर, मुस्तफा हवेलीवाला, सचिन पलंगे, विक्रम शिर्के इ. मान्यवर उपस्थित होते.
बारामती शहरातील 150 गरजू महिलांना साडी व वाफ घेण्याची मशिन (स्टिमर) चे वाटप करण्यात आले. यावेळी बाबुराव उबाळे, दीपक शिंदे, राहुल सावंत, पंकज दळवी विशाल पाटील, किशोर पवार, अधिराज जाधव, विजेंद्र काळे व सत्यव्रत काळे मित्रपरिवार इ. स्थानिक कार्यकर्ते उपस्थित होते.