बारामती(वार्ताहर): बारामती विकासाची सुवर्णनगरी करणारे व महाराष्ट्रातून एक नंबरच्या मताधिक्याने निवडून येणारे राज्याचे उपमुख्यमंत्री ना.अजित पवार यांच्या वाढदिवसानिमित्त बारामती स्पोटर्स फौंडेशनच्या (बीएसएफ) वतीने आयर्नमॅन सतिश ननवरे व काही सदस्यांनी पुणे ते बारामती 100 कि.मी. रिले रन करून अनोख्या आरोग्यदायी शुभेच्छा दिल्या आहेत.
दरवर्षीप्रमाणे याहीवर्षी राज्याचे उपमुख्यमंत्री ना.अजित पवार यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधुन त्यांना दीर्घायुष्य लाभावे म्हणून पुणे ते बारामती हे अंतर धावत पूर्ण केले. सतिश ननवरे यांनी केलेल्या आवाहनाला प्रतिसाद देत फौंडेशनचे 50 सदस्य व 20 बारामतीकरांनी सहभाग नोंदवला होता.
सदरची रॅली पुणे येथील सारसबाग या ठिकाणावरून सुरू करण्यात आली होती. बारामतीत आलेनंतर बारामतीकरांनी या रॅलीत सहभागी झालेल्यांचे उत्स्फूर्तपणे स्वागत केले व ना.अजित पवार यांना भरभरून शुभेच्छा दिल्या. प्रत्येक धावणार्याचे मनोबल वाढविण्याचे काम ज्ञानेश्र्वर (मामा) जगताप यांनी केले.