वतन की लकीर (ऑनलाईन): बारामती तालुक्यात रूग्णसंख्येत वाढ असल्याने चिंताजनक बाब समोर येत आहे. दि.27 जुलै 2021 रोजी दिवसभरात बारामती शहरातून 15 तर ग्रामीण भागातून 54 रुग्ण असे मिळून 69 कोरोना बाधित रुग्ण संख्या आढळून आले आहेत.
काल बारामतीत 530 जणांचे आरटी-पीसीआर नमुने घेण्यात आले होते त्यापैकी 07 रूग्ण पॉझिटिव्ह आढळून आले आहेत. एकही रुग्ण प्रतिक्षेत नसून व इतर तालुक्यात 03 रूग्ण पॉझिटिव्ह आढळून आले आहेत.
काल खाजगी प्रयोगशाळेत 76 रूग्णांची आरटी-पीसीआर तपासणी केली असता 17 रूग्ण पॉझिटिव्ह आढळून आले आहेत. 1523 रुग्णांची ऍन्टीजन तपासणी करण्यात आली यामध्ये 45 रुग्ण पॉझिटिव्ह आढळुन आले आहे.
म्युकर मायकॉसिसचे एकुण 39 रूग्णांपैकी बारामती तालुक्यातील 31 तर इतर तालुक्यातील 08 रूग्ण आहेत. यापैकी उपचार घेणारे 05 रूग्ण आहेत.
काल दिवसभरात बारामतीत एकूण 69 रुग्ण पॉझिटिव्ह आढळून आले आहेत. बारामतीत 26 हजार 774 रुग्ण असून, बरे झालेले 25 हजार 743 आहे. आज डिस्चार्ज 58 असुन, आतापर्यंत मृत्यू झालेले 680 असल्याचे तालुका आरोग्य अधिकारी डॉ.मनोज खोमणे यांनी कळविले आहे.