वतन की लकीर (ऑनलाईन): राज्यात काही दिवसांपासून रूग्णसंख्येत सातत्याने घट होताना दिसत आहे. रिकव्हरी रेटमध्येही वाढ होत असून मृत्यू दरात घट झालेली दिसत आहे. दैनंदिन मिळणार्या रूग्ण संख्येपेक्षा बरे होणारे रूग्णांची संख्या जास्त आहे त्यामुळे दिलासादायक वृत्त समोर आलेले आहे.
दुसर्या लाटेदरम्यान उद्भवलेली परिस्थिती पुन्हा येऊ नये यासाठी सरकार आणि प्रशासन प्रयत्नशील आहे. आयआयटी कानपूरच्या प्राध्यापकांनी एक दिलासादायक माहिती दिली आहे. आयआयटीचे प्रोफेसर मनिंद्र अग्रवाल यांनी गणिताच्या विश्लेषणाच्या ’फॉर्म्युला’च्या आधारे दावा केला आहे की तिसरी लाट दुसर्या लाटेपेक्षा कमी प्राणघातक असेल.
बारामतीत दि.24 जुलै 2021 रोजी दिवसभरात बारामती शहरातून 11 तर ग्रामीण भागातून 38 रुग्ण असे मिळून 49 कोरोना बाधित रुग्ण संख्या आढळून आले आहेत.
काल बारामतीत 453 जणांचे आरटी-पीसीआर नमुने घेण्यात आले होते त्यापैकी 05 रूग्ण पॉझिटिव्ह आढळून आले आहेत. एकही रुग्ण प्रतिक्षेत नसून व इतर तालुक्यात सुद्धा एकही रूग्ण पॉझिटिव्ह आढळून आलेला नाही.
काल खाजगी प्रयोगशाळेत 39 रूग्णांची आरटी-पीसीआर तपासणी केली असता 09 रूग्ण पॉझिटिव्ह आढळून आले आहेत. 838 रुग्णांची ऍन्टीजन तपासणी करण्यात आली यामध्ये 35 रुग्ण पॉझिटिव्ह आढळुन आला आहे. म्युकर मायकॉसिसचे एकुण 39 रूग्णांपैकी बारामती तालुक्यातील 31 तर इतर तालुक्यातील 08 रूग्ण आहेत. यापैकी उपचार घेणारे 05 रूग्ण आहेत.
काल दिवसभरात बारामतीत एकूण 49 रुग्ण पॉझिटिव्ह आढळून आले आहेत. बारामतीत 26 हजार 634 रुग्ण असून, बरे झालेले 25 हजार 574 आहे. आज डिस्चार्ज 41 असुन, आतापर्यंत मृत्यू झालेले 677 असल्याचे तालुका आरोग्य अधिकारी डॉ.मनोज खोमणे यांनी कळविले आहे.