वतन की लकीर (ऑनलाईन): कोविशिल्ड, कोवॅक्सिन, स्पुतनिक त नंतर आता लवकरच अमेरिकेची मॉडर्ना कोरोना लसही भारतात दिली जाणार आहे. अनेक श्रीमंत देशांमध्ये ही लस दिली जाते आहे. पण अशी महाग कोरोना लस भारताला मात्र मोफत मिळणार आहे.
कोवॅक्स ही अशी जागतिक स्तरावरील सुविधा आहे, जिथून गरजू, गरीब, विकसनशील देशांना लशीचा पुरवठा केला जातो आहे. मॉडर्ना लशीचे 7.5 दशलक्ष डोस कोवॅक्समार्फत भारतात अनुदान म्हणून दिले जातील, अशी माहिती डब्ल्यूएचओच्या सूत्रांनी दिली आहे.
बारामतीत दि.19 जुलै 2021 रोजी दिवसभरात बारामती शहरातून 18 तर ग्रामीण भागातून 43 रुग्ण असे मिळून 61 कोरोना बाधित रुग्ण संख्या आढळून आले आहेत.
काल बारामतीत 380 जणांचे आरटी-पीसीआर नमुने घेण्यात आले होते त्यापैकी 15 रूग्ण पॉझिटिव्ह आढळून आले आहेत. एकही रुग्ण प्रतिक्षेत नसून व इतर तालुक्यात 03 रूग्ण आढळून आले आहेत.
काल खाजगी प्रयोगशाळेत 27 रूग्णांची आरटी-पीसीआर तपासणी केली असता 01 रूग्ण पॉझिटिव्ह आढळून आले आहेत. 1212 रुग्णांची ऍन्टीजन तपासणी करण्यात आली यामध्ये 45 रुग्ण पॉझिटिव्ह आढळुन आला आहे. म्युकर मायकॉसिसचे एकुण 39 रूग्णांपैकी बारामती तालुक्यातील 31 तर इतर तालुक्यातील 08 रूग्ण आहेत. यापैकी उपचार घेणारे 04 रूग्ण आहेत.
काल दिवसभरात बारामतीत एकूण 61 रुग्ण पॉझिटिव्ह आढळून आले आहेत. बारामतीत 26 हजार 375 रुग्ण असून, बरे झालेले 25 हजार 341 आहे. आज डिस्चार्ज 57 असुन, आतापर्यंत मृत्यू झालेले 672 असल्याचे तालुका आरोग्य अधिकारी डॉ.मनोज खोमणे यांनी कळविले आहे.