वतन की लकीर (ऑनलाईन): साधु-संत येती दारा, तोचि दिवाळी-दसरा हे वाक्य गेल्या दोन वर्षापासून कागदावरच राहिलेले आहे. पालख्यांची आतुरतेने वाट पाहणारे भक्तगण धावत्या बसमधून पादुकांचे दर्शन न मिळाल्याने कोरोना कधी एकदाचा मेला जाईल अशी बोटं मोडताना भक्तगण दिसत आहेत.
कोरोनाचा प्रादुर्भाव होऊ नये म्हणून मोजक्याच नागरीकांना व दिंड्यांना पंढरपूरात प्रवेश देण्यात आला आहे. प्रशासनाने कडक निर्बंध लावलेले आहेत. तीन हजार पोलीस तैनात आहेत. मात्र रविवारी आलेल्या अहवालात पाच पोलीसांसह एका होमगार्डचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे.
बारामतीत दि.18 जुलै 2021 रोजी दिवसभरात बारामती शहरातून 05 तर ग्रामीण भागातून 11 रुग्ण असे मिळून 16 कोरोना बाधित रुग्ण संख्या आढळून आले आहेत.
काल बारामतीत 53 जणांचे आरटी-पीसीआर नमुने घेण्यात आले होते त्यापैकी एकही रूग्ण पॉझिटिव्ह आढळून आला नाही. एकही रुग्ण प्रतिक्षेत व इतर तालुक्यात आढळून आला नाही.
काल खाजगी प्रयोगशाळेत 54 रूग्णांची आरटी-पीसीआर तपासणी केली असता 06 रूग्ण पॉझिटिव्ह आढळून आले आहेत. 145 रुग्णांची ऍन्टीजन तपासणी करण्यात आली यामध्ये 10 रुग्ण पॉझिटिव्ह आढळुन आला आहे. म्युकर मायकॉसिसचे एकुण 39 रूग्णांपैकी बारामती तालुक्यातील 31 तर इतर तालुक्यातील 08 रूग्ण आहेत. यापैकी उपचार घेणारे 04 रूग्ण आहेत.
काल दिवसभरात बारामतीत एकूण 16 रुग्ण पॉझिटिव्ह आढळून आले आहेत. बारामतीत 26 हजार 330 रुग्ण असून, बरे झालेले 25 हजार 284 आहे. आज डिस्चार्ज 30 असुन, आतापर्यंत मृत्यू झालेले 672 असल्याचे तालुका आरोग्य अधिकारी डॉ.मनोज खोमणे यांनी कळविले आहे.