वतन की लकीर (ऑनलाईन): पुणे, पिंपरी-चिंचवड शहर आणि पुणे जिल्ह्यात ग्रामीण भागात 26 हजारांपुढे चाचण्यांची संख्या वाढविण्यात आली आहे. केंद्रशासित प्रदेश लडाख हा देशातील पहिला डोस देवून संपूर्ण नागरीकांचे लसीकरण करणारा प्रदेश ठरला आहे. राज्याचा रिकव्हरी रेट 1 टक्क्याने वाढलेला आहे. मृत्यू संख्येत सुद्धा घट झालेली आहे.
ग्रामीण भागात नागरिकांमध्ये कोरोनाबाबत भीती राहिलेली नाही आणि त्यामुळेच कोरोनापासून बचाव करण्यासाठी कराव्या लागणार्या उपाय योजनांबाबतची उदासीनता असल्याची खंत काही नागरिकांनी व्यक्त केली आहे.
कोरोनाची लक्षणे दिसत असताना देखील चाचणी करुन न घेणे तसेच याबाबत प्रशासनाला न कळविणे असे प्रकार देखील घडत आहेत. त्यातच ग्रामीण भागाकडे प्रशासनाचे झालेले दुर्लक्ष हे कोरोनावाढीचे एक कारण आहे.
कोरोना झाल्यानंतर समाज आपल्यावर बहिष्कार टाकेल या भीतीने लक्षणे दिसत असताना चाचणी केली जात नाही, तसेच अंगावर आजार काढला जातो. मला काही होत नाही हा गैरसमज देखील मोठ्या प्रमाणावर ग्रामीण भागात आहेत.
ग्रामीण भागातील मोठी लोकसंख्या ही कामानिमित्त आसपासच्या शहरात दररोज येत असते. अनलॉकनंतर अनेक व्यवहार सुरु झाल्याने शहरात कामानिमित्त जाणार्या नागरिकांची संख्या वाढली आहे.
बारामतीत दि.17 जुलै 2021 रोजी दिवसभरात बारामती शहरातून 10 तर ग्रामीण भागातून 48 रुग्ण असे मिळून 58 कोरोना बाधित रुग्ण संख्या आढळून आले आहेत.
काल बारामतीत 317 जणांचे आरटी-पीसीआर नमुने घेण्यात आले होते त्यापैकी 02 रूग्ण पॉझिटिव्ह आढळून आले आहेत. एकही रुग्ण प्रतिक्षेत नसून इतर तालुक्यात 01 रूग्ण पॉझिटिव्ह आढळून आला आहे.
काल खाजगी प्रयोगशाळेत 57 रूग्णांची आरटी-पीसीआर तपासणी केली असता 09 रूग्ण पॉझिटिव्ह आढळून आले आहेत. 773 रुग्णांची ऍन्टीजन तपासणी करण्यात आली यामध्ये 47 रुग्ण पॉझिटिव्ह आढळुन आला आहे. म्युकर मायकॉसिसचे एकुण 39 रूग्णांपैकी बारामती तालुक्यातील 31 तर इतर तालुक्यातील 08 रूग्ण आहेत. यापैकी उपचार घेणारे 04 रूग्ण आहेत.
काल दिवसभरात बारामतीत एकूण 58 रुग्ण पॉझिटिव्ह आढळून आले आहेत. बारामतीत 26 हजार 314 रुग्ण असून, बरे झालेले 25 हजार 254 आहे. आज डिस्चार्ज 43 असुन, आतापर्यंत मृत्यू झालेले 672 असल्याचे तालुका आरोग्य अधिकारी डॉ.मनोज खोमणे यांनी कळविले आहे.