एकात्मिक विकास समन्वय व पुर्नविलोकन समितीची पहिली आढावा बैठक संपन्न

बारामती(उमाका): मा. जिल्हाधिकारी, पुणे यांच्या आदेशान्वये बारामती तालुक्यातील एकात्मिक विकास समन्वय व पुर्नविलोकन समितीची पहिली आढावा बैठक दि. 8 जुलै 2021 रोजी प्रशसकीय भवन येथील बैठक सभागृहामध्ये तहसिलदार विजय पाटील यांच्या उपस्थित पार पडली.

यावेळी पंचायत समिती सभापती निता फरांदे, एकात्मिक विकास समन्वय व पुर्नविलोकन समितीचे अध्यक्ष संभाजी होळकर, गटविकास अधिकारी राहूल काळभोर, तालुका कृषि अधिकारी दतात्रय पडवळ, तालुका आरोग्य अधिकारी डॉ. मनोज खोमणे, निवासी नायब तहसिलदार धनंजय जाधव, एकात्मिक समितीचे सदस्य सुशांत जगताप, मंगेश खताळ, रमेश इंगुले, वनिता बनकर, अनिता गायकवाड, बाबासाहेब परकाळे, शिवाजीराव टेंगळे, निखिल देवकाते, सर्व विभागाचे अधिकरी/प्रतिनिधी व तहसिल कार्यालयातील कर्मचारी आदी उपस्थित होते.

प्रथम एकात्मिक समितीचे अघ्यक्ष संभाजी होळकर, पंचायत समितीच्या सभापती नीता फरांदे व समितीच्या सर्व सदस्यांचे तहसिलदार विजय पाटील आणि गट विकास अधिकारी राहूल काळभोर यांनी पुष्पगुच्छ देऊन अभिनंदनपर सत्कार केले. यानंतर तहसिलदार पाटील यांनी एकात्मिक विकास समन्वय व पुर्नविलोकन समितीचे कार्यक्षेत्र, उद्दिष्टे व कामांची माहिती सर्व उपस्थित मान्यवरांस दिली.

नंतर प्रत्येक विभागाच्या अधिकारी व प्रतिनिधी यांनी त्यांच्या विभागामार्फत बारामती तालुक्यासह शहरात सुरू असलेल्या विकास कामांची माहिती दिली. यामध्ये किती विकास कामांना मंजूरी मिळाली, त्यातील किती कामे पूर्ण झाली, किती कामे प्रलंबित आहेत, प्रलंबित असल्याची कारणे, कामांस लागणारे अनुदान, प्रलंबित कामे किती दिवसांत पूर्ण होतील याबाबतची माहिती दिली. यावेळी समितीच्या अध्यक्षांनी आणि सदस्यांनी संबंधित विभागास प्रश्न विचारुन त्याचे निरसन केले.

यानंतर समितीचे अध्यक्ष होळकर यांनी सर्व उपस्थितांचे स्वागत करुन प्रत्येक विभागाने दिलेच्या सविस्तर माहितीबद्वल समाधान व्यक्त केले. ते यावेळी म्हणाले की बारामती तालुक्यासह शहरात विविध विकास कामे चालू आहेत. सर्व विभाग ती जबाबदारीने पार पाडत आहेत ही पण एक समाधानाची बाब आहे. प्रत्येक काम वेळेत पूर्ण होणे आवश्यक आहे. यापुढेही बैठकीच्या माध्यमातून वेळोवेळी बारामती तालुक्यातील विकास कामांचा आढावा घेण्यात येईल, तसेच सर्व विभागांनी आणि सदस्यांनी समन्वय ठेवून कामे चांगल्या दर्जाची करावीत, अशा सूचनाही त्यांनी यावेळी दिल्या.

तहसिलदार पाटील यांनी सर्व संबंधित अधिकारी व प्रतिनिधी यांनी पुढील बैठकीस येण्यापूर्वी आठ दिवस अगोदर तयारी करावी व सर्व माहितीसह बैठकीला उपस्थित रहावे अशा सूचना दिल्या. विकास कामांच्या आड काही अडचणी येत असतील तर संबंधित विभागांनी त्या आढावा बैठकीत मांडाव्यात जेणे करुन त्यावर मार्ग निघेल, असेही ते म्हणाले. शेवटी तहसिलदार श्री.पाटील यांनी सर्व उपस्थितांचे आभार माणून बैठकीचा समारोप केला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Don`t copy text!