वतन की लकीर (ऑनलाईन): कोरोना काळात मुलांच्या डोळ्यांच्या तक्रारी वाढलेल्या आहेत. शाळा बंद असल्यामुळे ऑनलाईन अभ्यासाकरीता मोबाईल, लॅपटॉप किंवा कॉम्प्युटरचा वापर केला जातो. मुलं घरामध्येच अडकलेली असल्यामुळे इंनडोअर एक्टीव्हिटी वाढलेल्या आहेत. मुलांना इलेक्ट्रॉनिक डिव्हाईसचा वापर कमी करण्यासाठी प्रयत्न करा. सतत एका ठिकाणी नजर ठेवून पाहिल्यामुळे मायोपिया व्हायला लागलेला आहे.
डोळे सुकणं, डोळ्यांमध्ये सूज येणं, अस्पष्ट दिसणं, डोळे दुखणं, दूरच्या वस्तू अस्पष्ट दिसणं, झोप न लागणं. ही मायोपियाची काही लक्षणं आहेत. चीन, नेदरलँड नंतर भारतात सुद्धा मायोपिया सारखी लक्षणे असणारा आजार आढळून आला आहे. ऑल इंडिया इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्सच्या डॉ.राजेंद्र प्रसाद सेंटर फॉर ऑप्थेल्मिक सायन्सचे प्रोफेसर डॉक्टर अतुल कुमार यांनी सांगितले आहे.
बारामतीत दि.12 जुलै 2021 रोजी दिवसभरात बारामती शहरातून 16 तर ग्रामीण भागातून 25 रुग्ण असे मिळून 41 कोरोना बाधित रुग्ण संख्या आढळून आले आहेत.
काल बारामतीत 363 जणांचे आरटी-पीसीआर नमुने घेण्यात आले होते त्यापैकी 13 रूग्ण पॉझिटिव्ह आढळून आले आहेत. एकही रुग्ण प्रतिक्षेत नसून, इतर तालुक्यात 06 रूग्ण पॉझिटीव्ह आढळून आले आहेत. काल खाजगी प्रयोगशाळेत 28 रूग्णांची आरटी-पीसीआर तपासणी केली असता 07 रूग्ण पॉझिटिव्ह आढळून आले आहेत. 388 रुग्णांची ऍन्टीजन तपासणी करण्यात आली यामध्ये 21 रुग्ण पॉझिटिव्ह आढळुन आला आहे. म्युकर मायकॉसिसचे एकुण 39 रूग्णांपैकी बारामती तालुक्यातील 31 तर इतर तालुक्यातील 08 रूग्ण आहेत. यापैकी उपचार घेणारे 05 रूग्ण आहेत.
काल दिवसभरात बारामतीत एकूण 41 रुग्ण पॉझिटिव्ह आढळून आले आहेत. बारामतीत 26 हजार 037 रुग्ण असून, बरे झालेले 25 हजार 094 आहे. आज डिस्चार्ज 27 असुन, आतापर्यंत मृत्यू झालेले 667 असल्याचे तालुका आरोग्य अधिकारी डॉ.मनोज खोमणे यांनी कळविले आहे.