वतन की लकीर (ऑनलाईन): पुणे जिल्ह्यातील ग्रामीण भागातील 107 गावात कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव असून, सर्वाधिक जुन्नर तालुक्यात वाढता प्रादुर्भाव दिसत आहे. आंबेगाव, वेल्हे, जुन्नर, दौंड, बारामती, खेळ, मावळ, मुळशी, पुरंदर व हवेली या गावात रूग्ण संख्या वाढत आहे. ग्रामीण भागात नविन रूग्णांची संख्या वाढत आहे.
देशात जरी काही राज्यांमध्ये कोरोना रुग्णांचा आकडा कमी होत असला तरी केरळ आणि महाराष्ट्र राज्यात कोरोनाची परिस्थिती अजूनही चिंताजनक आहे. महाराष्ट्रात गेल्या 24 तासांमध्ये 10 हजारांपेक्षा अधिक जणांना डिस्चार्ज मिळाला आहे. राज्यात दिवसात एकूण 10 हजार 458 जणांनी यशस्वीरित्या मात केली आहे. त्यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचा दर हा एकूण 96.08 % झाला आहे.
कोरोनामुळे दिवसभरात 200 जणांचा मृत्यू झाला आहे. परिणामी राज्यातील मृत्यू दरात काही अंशी वाढ झाली आहे. राज्याचा मृत्यू दर हा आता 2.03 % इतका झाला आहे. काही दिवसांपासून हा मृत्यू दर 2.0 तसेच 2.01 इतका होता. ही वाढ .2 ने झाली असली तरी त्यामुळे चिंतेत भर पडली आहे.
बारामतीत दि.09 जुलै 2021 रोजी दिवसभरात बारामती शहरातून 21 तर ग्रामीण भागातून 37 रुग्ण असे मिळून 58 कोरोना बाधित रुग्ण संख्या आढळून आले आहेत.
काल बारामतीत 244 जणांचे आरटी-पीसीआर नमुने घेण्यात आले होते त्यापैकी 40 रूग्ण पॉझिटिव्ह आढळून आले आहेत. एकही रुग्ण प्रतिक्षेत नसून, इतर तालुक्यात 07 रूग्ण पॉझिटीव्ह आढळून आले आहेत. काल खाजगी प्रयोगशाळेत 43 रूग्णांची आरटी-पीसीआर तपासणी केली असता 02 रूग्ण पॉझिटिव्ह आढळून आले आहेत. 993 रुग्णांची ऍन्टीजन तपासणी करण्यात आली यामध्ये 16 रुग्ण पॉझिटिव्ह आढळुन आला आहे. म्युकर मायकॉसिसचे एकुण 39 रूग्णांपैकी बारामती तालुक्यातील 31 तर इतर तालुक्यातील 08 रूग्ण आहेत. यापैकी उपचार घेणारे 06 रूग्ण आहेत.
काल दिवसभरात बारामतीत एकूण 58 रुग्ण पॉझिटिव्ह आढळून आले आहेत. बारामतीत 25 हजार 932 रुग्ण असून, बरे झालेले 24 हजार 987 आहे. आज डिस्चार्ज 18 असुन, आतापर्यंत मृत्यू झालेले 665 असल्याचे तालुका आरोग्य अधिकारी डॉ.मनोज खोमणे यांनी कळविले आहे.