केंद्राने महागाई करून जनतेला आर्थिकदृष्ट्या हतबल केले – संभाजी होळकर

बारामती(वार्ताहर): केंद्र सरकारने खोटी आश्र्वासने, मोकळ्या भूलथापा मारून अर्थव्यवस्थेची पूर्णपणे वाट लावलेली आहे. पेट्रोल,डिझेल व घरगुती गॅसच्या किमती प्रचंड प्रमाणात वाढवुन सर्व सामान्य जनतेचे जीवन अर्थिकदृष्टया हतबल केले असल्याचे राष्ट्रवादी कॉंग्रेस पार्टीचे तालुकाध्यक्ष संभाजी होळकर यांनी प्रतिक्रीया व्यक्त केली.

राष्ट्रवादी कॉंग्रेस बारामती तालुका व शहरच्या वतीने केंद्राने पेट्रोल, डिझेल व घरगुती गॅस दरवाढ कमी होण्यासाठी निवेदन देण्यात आले. यावेळी राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचे शहराध्यक्ष इम्तियाज शिकीलकर, सौ.पौर्णिमा तावरे, बाळासाहेब तावरे, राजवर्धन शिंदे, मदनराव देवकाते, विश्र्वास देवकाते, तानाजी कोकरे, प्रशांत काटे, अमर धुमाळ, राहुल वाबळे, धनवान वदक, संदीप जगताप, ऍड.अविनाश गायकवाड, नितीन शेंडे, किरण तावरे, आप्पा अहिवळे, सुखदेव हिवरकर, शिवाजीराव टेंगले, पोपट पानसरे, साधु बल्लाळ, शब्बीर शेख, असगर नगरवाला, सौ.वनिता बनकर, सौ.आरती शेंडगे, भाग्यश्री धायगुडे इ. मान्यवर उपस्थित होते.

पुढे होळकर म्हणाले की, अच्छे दिन येईल, महागाई कमी करू अशा घोषणांचा पाऊस पाडल्याने जनतेने केंद्रात भाजपला सत्तेवर बसविले. पण अच्छे दिन तर आलेच नाहीत पण किरकोळ महागाईचा तर गेल्या दहा वर्षाच्या उच्चांकावर गेला आहे. जीव वाचवावा की पोट भरावे अशा चिंतेत जनता असताना सरकारने केंद्राने महागाईवर नियंत्रण आणणे आवश्यक आहे.

बाजारात अशी एकही वस्तू नाही जिची भाववाढ झाली नाही. सर्वत्र महागाईचा अंगार आहे. सिलिंडर तर एका वर्षात तब्बल 244 रूपयांनी महागले. इंधन, खाद्यतेल, बांधकाम साहित्य आणि पशुखाद्यांचे भाव तर कधी नव्हे एवढे प्रचंड वाढले आहेत. इंधनाच्या दरवाढीने मालवाहतुकीचे दर वाढल्याने भाजीपाला, फळे महाग झाले. लसूण, आले आणि कांदाही डोळ्यात अश्रू आणत आहे. अशा परिस्थितीत सामान्य जनता बैचेन झालेली आहे. नवीन रोजगार निर्मिती न करता लाखो तरुण बेरोजगार झाले आहेत.

अनेक वेगवेगळ्या प्रकारची करवाढ लावुन प्रचंड दरवाढ करून गोरगरीब जनतेच्या तोंडातील घास काढण्याचे महापाप केंद्र सरकारने केले आहे. अशा सामान्य गोरगरीब जनतेशी असंवेदनशीलपणे वागणार्‍या या केंद्र सरकारचा बारामती तालुका व शहर राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाच्या वतीने यावेळी जाहीर निषेध करण्यात आला आहे. केंद्र सरकारने पेट्रोल, डिझेल व घरगुती गॅस दरवाढ त्वरीत कमी करावी अशा मागणीचे निवेदन प्रांताधिकारी यांना देण्यात आले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Don`t copy text!