(अशोक कांबळे यांजकडून)
बारामती (प्रतिनिधी) :- निरंकारी भक्त रक्तदान करून मानवजातीची सेवा करीत आहेत आणि या जगातील संपूर्ण मानवता आमची आहे आणि त्यांचे सेवा करणे आपले कर्तव्य आहे, असा संदेश सतगुरु माता सुदीक्षा जी महाराजांचा संदेश देत आपणही या सेवेत उपस्थित राहुन उत्स्फूर्तपणे रक्तदान करावे असे सातारा झोनचे झोनल प्रमुख नंदकुमार झांबरे यांनी सांगितले आहे.
बारामती क्षेत्राचे क्षेत्रीय संचालक किशोर माने यांच्या सहकार्याने रविवारी (ता.4) सकाळी 9 ते 4यावेळेत रक्तदान शिबीराचे आयोजन केले आहे. सदरचे शिबीर खंडोबानगर येथील सत्संग भवनात होणार आहे. संत निरंकारी मिशन आध्यात्माबरोबर आरोग्य शिबीर, रक्तदान शिबीर, स्वच्छता अभियान, वृक्षारोपण, नैसर्गिक आपत्कालीन परिस्थितीत मदत, कोविड-19 परिस्थितीमध्ये मदत कार्य आदी सामाजिक कार्य जोपासत असल्याचे मिशनचा नावलौकिक आहे.
रविवारी होणार्या या शिबिरात निरंकारी अनुयायांबरोबर इतरांनीही उत्स्फूर्तपणे रक्तदान करावे असे आवाहन झांबरे यांनी केले आहे. सदरचे शिबिरात सामाजिक अंतर, मुखवटे परिधान करणे आणि सॅनिटायझर्स वापरणे यासारख्या सर्व आवश्यक पालन करून शिबीर पार पडणार असल्याचेही श्री. झांबरे यांनी सांगितले.