बारामती(वार्ताहर) 30जून 2021 रोजी प्रशासकीय भवन येथे शासकीय दक्षता समिती बारामतीची पहिली सभा अध्यक्ष ऍड.आविनाश वामनराव गायकवाड यांचे अध्यक्षते खाली संपन्न झाली.
या प्रसंगी सदस्य सचिव तथा तहसिलदार बारामती विजय पाटील यांचे हस्ते नवनिर्वाचीत अध्यक्ष व सर्व सदस्य यांचा पुष्पगुच्छ देऊन अभिनंदनपर सत्कार करण्यात आला. या प्रसंगी शहरातील वितरण व्यवस्थेमध्ये अधिक सुसुत्रता आणून येणार्या सूचना व तक्रारी बरहुकूम नियंत्रण ठेवण्याचा ठराव पारीत करण्यात आला. या सभेला सदस्य विरधवल गाडे, बाळासाहेब चव्हाण, सचिन माने, शौकत बागवान, श्रीमती रेहना शिकीलकर, श्रीमती रेश्मा ढोबळे, सुशांत सोनवणे, मधुकर नागवडे, नायब तहसिलदार श्री. भोसले, श्री.चव्हाण इ. उपस्थित होते.