सातबारा व फेरफार संगणीकरणबाबत बैठक संपन्न

बारामती(उमाका): बारामती तालुक्यातील सातबारा संगणिकरण बाबतची बैठक जिल्हाधिकारी डॉ राजेश देशमुख यांच्या अध्यक्षतेखाली प्रशासकीय भवन येथील बैठक हॉल मध्ये पार पडली. यावेळी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आयुष प्रसाद, प्रांताधिकारी दादासाहेब कांबळे, गट विकास अधिकारी राहुल काळभोर, उपमुख्यमंत्री यांचे खासगी सचिव हनुमंत पाटील, निवासी नायब तहसिलदार धनंजय जाधव, उपविभागीय कार्यालयातील नायब तहसिलदार भक्ती सरवदे, तालुक्यातील सर्कल आणि तलाठी आदी उपस्थित होते.

तहसिलदार विजय पाटील यांनी सर्वप्रथम बारामती तालुक्यातील किती ठिकाणी सातबारा संगणिकरण झाले आहे तसेच फेरफरच्या किती नोंदी घेण्यात आल्या आहेत तसेच कोरोना मुळे मृत्यू झालेल्या किती व्यक्ती संजय गांधी गांधी निराधार योजनेअंतर्गत लाभ देण्यास पात्र आहेत याची माहिती दिली.

जिल्हाधिकारी डॉ राजेश देशमुख यांनी उपस्थित सर्कल आणि तलाठी यांच्या। काही अडीअडचणी आहेत का हे जाणून घेतल्या. सातबारा संगणिकराण करणे ही खुप महत्वकांक्षी योजना आहे, यावर सर्वांनी दैनंदिन लक्ष दिले पाहिजे, फेरफार अद्यावत करणे प्रलंबित ठेवू नये संजय गांधी निराधार योजना व इतर योजना वेळेत मार्गी लावणे सर्वांनी नागरिकांना उपलब्ध होणे आवश्यक आहे, फेरफार निर्गती मधे बारामती तालुका अव्वल राहील यापद्ध्तीने कामकाज करावे. ई पीक पाहणीबाबत लोकांना अपडेट माहिती मिळणे आवश्यक आहे, सर्वानीच शासनाची प्रतिमा उंचावण्यासाठी काम करावे इत्यादी सूचना त्यांनी दिल्या.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Don`t copy text!