बारामती(वार्ताहर): ओबीसी व मराठा आरक्षण रद्द होण्यास संपूर्णपणे महाविकास आघाडी सरकारच जबाबदार असल्याचे आरक्षणाच्या निषेधार्थ भारतीय जनता पार्टीने चक्काजाम आंदोलन प्रसंगी बोलताना व्यक्त केले.
26 जून रोजी राजश्री शाहू महाराज यांच्या जयंतीचे औचित्य साधून संपूर्ण महाराष्ट्रामध्ये एक हजार ठिकाणी भाजपाच्या नेत्या पंकजाताई मुंडे यांच्या नेतृत्वाखाली चक्काजाम रास्ता रोको आंदोलन करण्यात आले आहे.
बारामतीमध्ये भिगवण रोडवरती भाजपच्या कार्यकर्तेनी दोन तास चक्काजाम आंदोलन केले. जर येणार्या काळात आघाडी सरकारने ओबीसी व मराठा आरक्षणा संदर्भात योग्य ती पावलं उचलली नाही तर तीव्र स्वरूपाचे आंदोलन करणार असल्याच्या इशारा दिला आहे. या आघाडी सरकारला महाराष्ट्रातील जनता धडा शिकवल्याशिवाय राहणार नाही.
तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांनी न्यायलयात टिकणारे मराठा समाजाला शिक्षण व नोकरीमध्ये दिलेले आरक्षणसुद्धा या सरकारच्या निष्काळजीपणामुळे व बेफिकीरीमुळे गेले आहे.
गेल्या दीड वर्षांमध्ये महाराष्ट्रामध्ये आलेल्या अनैसर्गिक आघाडी सरकारमुळे ओबीसी आरक्षणाबद्दल सर्वोच्च न्यायालयाने आठ वेळा तारखा देऊनही आघाडी सरकारच्या चालढकल व निष्काळजीपणामुळे कोर्टाने नाईलाजास्तव महाराष्ट्रात 52 टक्के असणार्या ओबीसी समाजाचे राजकारणातील स्थानिक स्वराज्य संस्थेतील आरक्षण रद्दबातल केले आहे.त्यामुळे संपूर्ण ओबीसी समाजाचे न भरून येणारे नुकसान झाले आहे यामुळे मराठा व ओबीसी समाजामध्ये आघाडी सरकारच्या विरोधात प्रचंड संतापाची लाट आहे. ओबीसी व मराठा आरक्षण रद्द होण्यास संपूर्णपणे महाविकास आघाडी सरकारच जबाबदार असल्याचे बारामतीतील भाजपा पदाधिकारी यांनी ठामपणे सांगितले आहे,
यावेळी भाजपाचे प्रदेश निमंत्रित सदस्य बाळासाहेब गावडे, जिल्हा सरचिटणीस अविनाश मोटे, तालुकाध्यक्ष पांडुरंग कचरे,शहराध्यक्ष सतीश फाळके, जिल्हा कार्यकारणी सदस्य गोविंद देवकाते, माळेगाव संचालक ऍड. जी.बी.गावडे, ऍड.नितीन भामे,युवा मोर्चा अध्यक्ष ज्ञानेश्वर माने, किसान मोर्चाचे अध्यक्ष धनुभाऊ गवारे, युवा मोर्चाचे शहराध्यक्ष सचिन मलगुंडे, भटके-विमुक्तचे अभिजीत देवकाते, युवा मोर्चाचे जिल्हा उपाध्यक्ष युवराज तावरे, अजित मासाळ, प्रमोद तावरे, संदीप अभंग, सुरज खैरे, राजेभाऊ कांबळे, शहाजी कदम, मुकेश वाघेला, रघु चौधर, भारत देवकाते भाजपा कार्यकर्ते मोठ्या प्रमाणात उपस्थित होते.