निमोनिया सदृश्य आजाराने शेकडो मेंढ्यांना लागण : 40 ते 50 मेंढ्या या आजाराने मृत

अशोक घोडके यांजकडून…
गोतोडी(वार्ताहर): कचरवाडी गोतोंडी हद्दीतील माळरानावर खूप मोठ्या प्रमाणावर मेंढपाळांचे वास्तव्य असून हजारो मेंढ्या व लहान कोकरे या ठिकाणी चरत असतात. दोन-तीन दिवसात निमोनिया सदृश्य आजाराने 40 ते 50 मेंढ्यांचा मृत्यू झाला असून, शेकडो मेंढ्यांना या रोगाची लागण झाली आहे. आणि त्याही मेंढ्या दगावण्याची शक्यता असल्याने मेंढपाळांमध्ये भीतीचे वातावरण आहे.

या घटनेची माहिती समजताच रासपा जिल्हाध्यक्ष किरण गोफणे, शेतकरी सुकाणू समितीचे ऍड. श्रीकांत करे, सामाजिक कार्यकर्ते ऍड. सचिन राऊत, आप्पा माने, रावा खडके यांनी घटनास्थळी धाव घेऊन ही माहिती पशु वैद्यकीय अधिकारी यांना कळवली. घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन पूर्ण टीम सहित घटनास्थळी हजर राहून मेंढ्यांची तपासणी केली. यावेळी डॉ.जानकर यांनी सांगितले की हा निमोनिया सदृश्य आजार असून वेळेत उपचार न मिळाल्याने अशक्तपणा येऊन या मेंढ्यांचा मृत्यू झाला आहे. परंतु या मेंढ्यांच्या डोळ्या वरती चेहर्‍यावरती व कानाला सूज येऊन या मेंढ्या दोन दिवसातच मरण पावत आहेत.

निमगाव केतकी चे गाव कामगार तलाठी गोरक्ष इंगळे यांनी मृत झालेल्या व लागण झालेल्या मेंढ्यांचे पंचनामे केले आहेत. यामध्ये गुलाब खडके, संपत खडके, हिरा खडके, लक्ष्मण तांबे, भगवान दगडे, धुळा खडके यांच्या मेंढ्यांना लागण होऊन मेंढ्या मृत पावल्या असून लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे. प्रशासनाने याकडे लक्ष देऊन त्वरित मदत करण्याचे आवाहन यावेळी करण्यात आले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Don`t copy text!