बारामतीत छत्रपती शाहू महाराज जयंती उत्साहात साजरी

बारामती(वार्ताहर):आरक्षणाचे जनक छत्रपती शाहू महाराज यांची जयंती बारामती शहरातील भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर पुतळा स्मारक या ठिकाणी कोरोनाच्या प्रतिबंधात्मक नियमांचे पालन करीत विविध क्षेत्रातील मान्यवरांच्या उपस्थितीत साजरी करण्यात आली.

भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि छत्रपती शाहू महाराज यांच्या प्रतिमेला पोलीस निरीक्षक नामदेव शिंदे, छत्तीसगडचे पोलीस अधिकारी अजय शेलार यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून त्रिशरण पंचशील ग्रहण करण्यात आले.

यावेळी माजी नगराध्यक्ष कैलास चव्हाण, बसपाचे काळुराम चौधरी, सवाणे गुरुजी, प्रा.नीलकंठ ढोणे, ऍड.विनोद जावळे यांनी छत्रपती शाहू महाराजांनी केलेल्या ऐतिहासिक कार्याच्या स्मृतींना उजाळा देत मनोगत व्यक्त केले. या कार्यक्रमास माजी उपनगराध्यक्ष भारत अहिवळे, विलास शेलार, नगरसेवक सुरज सातव,बिरजू मांढरे, नगरसेविका अनिता जगताप, माजी नगरसेविका आरती शेंडगे, जिजाऊ ब्रिगेडच्या तालुका अध्यक्षा प्रा.सुषमा जाधव, सचिव प्रा. शिलाराणी रंधवे, कार्याध्यक्षा प्रा.विद्याराणी चव्हाण, मराठा सेवा संघाचे दीपक भराटे,विकास खोत, संतोष सातव, सुरज शिंदे, नितीन शेलार, तैनूर शेख, मंगलदास निकाळजे, अभिजित कांबळे, तानाजी पाथरकर, श्याम जाधव, निखिल देवकाते आदी उपस्थित होते.

यावेळी शाहू महाराजांची जयंती सणाप्रमाणे साजरी करा या डॉ.बाबासाहेब आंबेडकरांच्या वाक्याचा संदर्भ देत. विश्वरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर सार्वजनिक जयंती महोत्सव समितीच्या वतीने उपस्थितांना लाडू वाटप करून तोंड गोड करण्यात आले. हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी जयंती महोत्सव समितीचे सदस्य गौतम शिंदे, ऍड.सुशिल अहिवळे, प्रा.रमेश मोरे, चेतन शिंदे, गजानन गायकवाड, सोमनाथ रणदिवे, चंद्रकांत भोसले, शंकर गव्हाळे, कैलास शिंदे, सिद्धार्थ शिंदे, सचिन जगताप, मनोज केंगार, सुशील भोसले, शुभम अहिवळे यांनी परिश्रम घेतले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Don`t copy text!