बारामती(वार्ताहर): कमी कालावधीत राजकीय व सामाजिक क्षेत्रात नावलौकीक मिळविलेल्या वंचित बहुजन आघाडी पक्षाच्या पुणे जिल्हा उपाध्यक्षपदी ऍड. वैभव सुरेश काळे यांची निवड करण्यात आली.
वंचित बहुजन आघाडी पक्षाचे संस्थापक अध्यक्ष Aऍड.प्रकाश (बाळासाहेब) आंबेडकर यांच्या आदेशांनी ऍड.काळे यांची निवड करण्यात आली. निवडीचे पत्र पक्षाचे महाराष्ट्र राज्याचे उपाध्यक्ष अनिल अण्णा जाधव यांचे हस्ते व पुणे जिल्हा अध्यक्ष विनोद भालेराव यांच्या उपस्थितीत पुणे याठिकाणी देण्यात आले.
ऍड.काळे यांनी ज्याप्रमाणे कमी कालावधीत वकिली क्षेत्रात नावलौकीक मिळविला आहे. त्यांच्या कामातून त्यांनी एक वेगळी ओळख निर्माण केली आहे त्याचप्रमाणे ते वंचित बहुजन आघाडी पक्षाचे ऍड.आंबेडकर यांच्या मार्गदर्शनाखाली समाजहितासाठी वेगळी प्रतिमा निर्माण करणार यात शंका नाही. त्यांच्या निवडीमुळे सर्व स्तरातून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे. पुढील काळात वंचितांसाठी न्याय, हक्कासाठी लढा देणार असल्याचे ऍड.काळे यांनी आमच्या प्रतिनिधीशी बोलताना सांगितले.