बारामती(वार्ताहर): प्रभाग क्र.15 सृष्टी कॉम्प्लेक्स् मागील नागरीकांना तातडीने ड्रेनेज लाईनची व्यवस्था करावी अन्यथा रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले) तर्फे तीव्र आंदोलन छेडण्यात येईल असे जिल्हा युवक सरचिटणीस रविंद्र सोनवणे यांनी उपविभागीय अधिकारी यांना लेखी निवेदनाद्वारे कळविले आहे.
ड्रेनेज लाईन नसल्यामुळे दैनंदिन वापराचे सांडपाणी नाईलाजास्तव उघड्यावर साचून राहत आहे. अशा साचलेल्या सांडपाण्यामुळे स्थानिक नागरिकांच्या आरोग्यास बाधा निर्माण होऊ शकते. त्यामुळे स्थानिक नागरिकांच्या मागणीस आणि आरोग्यास प्राधान्य देत तत्काळ सदरील ठिकाणी अंतर्गत ड्रेनेज लाईन ची व्यवथा करावी. याबाबतचे लेखी निवेदन बारामतीचे प्रांताधिकारी साहेब, नगराध्यक्षा आणि मुख्याधिकारी यांना देण्यात आले. याप्रसंगी आरपीआयचे पुणे जिल्हा युवक सरचिटणीस रविंद्र (पप्पू) सोनवणे, जिल्हा महिला कार्याध्यक्षा रत्नप्रभा साबळे, शहराध्यक्ष अभिजित कांबळे, शहर सचिव सम्राट गायकवाड तसेच शाहरुख तांबोळी इ.उपस्थित होते.