बारामती(वार्ताहर): वंचित बहुूजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष बाळासाहेब आंबेडकर यांच्या आदेशाने कोरोना महामारीत गगनास भिडलेल्या महागाईचा बारामतीत वंचित बहुजन आघाडीच्या वतीने देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना लेखी निवेदन देवून महागाईचा निषेध करण्यात आला आहे.
महागाईची झळ व जीवघेणी अवस्था सध्या नागरीक सोसत आहेत. वैद्यकीय खर्चात लूट झाली. जीवनावश्यक वस्तु स्वत: दरात पुरविणे दूर त्याचे भाव गगनास भिडले आहेत. अशा परिस्थितीत पोषक आहार घेऊन रोग प्रतिकार शक्ती वाढविण्याऐवजी उपासमारीची वेळ आली आहे. कित्येकांना रोजगारापासून मुकावे लागले. संचारबंदीचे नियम पाळत उद्योग धंदे बंद पडले. यामुळे झोपलेल्या व निर्दयी केंद्र व राज्य शासनाला जागे करण्यासाठी वंचित बहुजन आघाडीतर्फे महागाई लवकरात लवकर कमी करून देशातील नागरीकांना न्याय द्यावा अन्यथा तीव्र स्वरूपाचे देशव्यापी आंदोलन करण्यात येईल असा इशाराही दिलेल्या निवेदनात दिला आहे. निवेदन देतेवेळी जिल्हा पूर्वचे महासचिव मंगलदास निकाळजे, जिल्हा उपाध्यक्ष ऍड. वैभव काळे, ऍड.रियाज खान, शहराध्यक्ष अक्षय शेलार, मयूर कांबळे, सम्यक विद्यार्थी आंदोलनाचे रोहित भोसले इ.कार्यकर्ते उपस्थित होते.