बारामती(वार्ताहर): नागरी स्थानिक स्वराज्य संस्थांनी अपळारश्र इळीींह उेपींीेश्र चेपळींेीळपस उेााळींींशश स्थापन करून त्याबाबतचा व सदर समित्यांनी केलेल्या कार्यवाहीबाबतचा अहवाल सादर करणे अपेक्षित होते. बारामती नगरपरिषदेने या आदेशाची कशाप्रकारे अंमलबजावणी केली आहे याबाबत माहिती घेणेसाठी ऍड.भार्गव पाटसकर, ऍड.निलेश वाबळे, सोमनाथ पाटोळे, शेखर सातकर यांनी बानपचे आरोग्य निरीक्षक राजेंद्र सोनवणे व सुभाष नारखेडे भेट घेऊन चर्चा केली.
मा.सर्वोच्च न्यायालयात एक याचिका दाखल करण्यात आली होती आणि सदर याचिकेत निमल वेल्फेअर बोर्ड ऑफ इंडिया, केंद्र शासन यांनी सादर केलेल्या शपथ पत्रानुसार कुत्र्यांची वाढती संख्या मर्यादित ठेवण्यासाठी, रेबीज निर्मुलनासाठी आणि मनुष्य-कुत्रा संघर्ष टाळण्यासाठी महाराष्ट्र शासनाने एक परिपत्रक काढून मा.सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या आदेशानुसार सर्व स्थानिक स्वराज्य संस्थांनी करावयाच्या कार्यवाहीबाबत निर्देश दिले आहेत.