मळद येथे खरीप हंगाम शुभारंभ

बारामती: एकता शेतकरी गट मळद, कृषी विज्ञान केंद्र बारामती व महाराष्ट्र शासन कृषी विभाग बारामती यांच्या संयुक्त विद्यमाने शुक्रवार 11 जून 2021 रोजी सकाळी ठीक 10 वाजता खरीप हंगाम शुभारंभ कार्यक्रम प्रशांत शेंडे, वस्ती, मळद येथे पार पडला.

यावेळी पंचायत समिती सभापती निता फरांदे, जिल्हा परिषद सदस्य भारत गावडे, बारामती तालुका राष्ट्रवादी कॉंग्रेस अध्यक्ष नितीन शेंडे, मळदचे सरपंच योगेश बनसोडे, कृषी विज्ञान केंद्र बारामतीचे डॉ.मिलिंद जोशी, कृषी विभाग तंत्र अधिकारी सुप्रिया शिळीमकर, ऊस विकास अधिकारी माळेगाव कारखाना सुरेश काळे, मंडळ कृषि अधिकारी चंद्रकांत मासाळ तसेच मळद, गुणवडी,बारामती,निरावागज येथील बहुसंख्य शेतकरी उपस्थित होते.

या कार्यक्रमावेळी उपस्थित शेतकर्‍यांना खरीप हंगामातील पिकाचे कीडनियंत्रण, लागवड व्यवस्थापन , हुमणी नियंत्रण याबाबत डॉ. जोशी यांनी सखोल माहिती दिली. सुपरकेन नर्सरी बाबत कारखान्याचे ऊस विकास अधिकारी श्री सुरेश काळे साहेब यांनी मार्गदर्शन केले. सोयाबीन पिकाचे सखोल मार्गदर्शन सुप्रिया शिळीमकर यांनी केले. सुपरकेन नर्सरी बाबत मनिश हिंगणे व चारुदत्त गावडे यांनी आपले अनुभव कथन केले. आत्मा योजनेचे गणेश जाधव यांनी सेंद्रिय शेती प्रमाणिकरण याबाबत माहिती दिली. याप्रसंगी रणजित धायगुडे, किरण दत्तात्रय गोरे यांचा प्रक्रिया उद्योग सक्षमपणे चालविल्याबद्दल सभापती सभापती फरांदे यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. कार्यक्रमात शेतीशाळेची प्रार्थना गावच्या कृषि सहायक सुप्रिया पवार यांनी देवून आयसीएम क्लॅप दिली. सदर कार्यक्रमाचे नियोजन व सूत्रसंचालन एकता सेंद्रिय गट मळद चे अध्यक्ष प्रशांत वामनराव शेंडे यांनी केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Don`t copy text!