अशोक घोडके यांजकडून…
गोतोंडी(वार्ताहर): माजी मंत्री व भाजपचे नेते हर्षवर्धन पाटील हे सुमारे 30 वर्षापूर्वीच्या आठवणीत रमून गेले, निमित्तही तसेच होते. अंथुर्णे येथे जुन्या पिढीतील ज्येष्ठ मार्गदर्शक तात्यारामबापू शिंदे यांची हर्षवर्धन पाटील यांनी शुक्रवारी (दि.11 ) सदिच्छा भेट घेतली. यावळी दोघेही जुन्या आठवणींच्या गप्पांमध्ये रमून गेले.
तात्यारामबापु आज वयाची नव्वदीत आहेत. या वयातही त्यांची तब्येत उत्तम आहे. तात्यारामबापू शिंदे यांनी कर्मयोगी शंकररावजी पाटील उर्फ भाऊ यांचेसमवेत काम केले. नंतरच्या काळात हर्षवर्धन पाटील यांना मार्गदर्शन केले. तात्यारामबापुंनी तालुक्यातील विविध संस्थांवर तसेच कात्रज जिल्हा दुध संघावर संचालक म्हणून काम केले. बापुंच्या भाषणात विनोदी टीकाटिप्पणी होत असल्याने कार्यकर्ते भाषणासाठी आतुरलेले असत. या भेटीत गप्पांमध्ये हर्षवर्धन पाटील यांनी जुन्या आठवणींना उजाळा देत बापूंचे अनेक किस्से सांगितले. तसेच बापूंना निरोगी दीर्घायुष्य लाभो, अशी सदिच्छा व्यक्त केली. दरम्यान, तात्यारामबापूंच्या भेटीतून नवी ऊर्जा मिळाली, अशी प्रतिक्रिया हर्षवर्धन पाटील दिली.