बारामती(वार्ताहर): विकास कामाचा रोष मनात धरून फिर्यादी सौ.रोहिणी रविराज तावरे यांच्या कार्यकर्त्यांना वारंवार धमकाविण्याचा प्रयत्न करून, राजकीय व आर्थिक फायद्यासाठी फिर्यादीचे पती यांना संपवून त्याजोगी दहशत माजविणेचे हेतूने कट रचणार्या आरोपी प्रशांत पोपटराव मोरे, विनोद उर्फ टॉम पोपटराव मोरे, राहुल उर्फ रिबल कृष्णांत यादव व आकाश मोरे (विधी संघर्षग्रस्त बालक) यांचेवर महाराष्ट्र संघटीत गुन्हेगारी नियंत्रण अधिनियम सन 1999 चे कलम 3(1) (खख),3(4) (मोक्का) हे वाढीव कलम लावण्यात आले असल्याचे अपर पोलीस अधिक्षक मिलिंद मोहिते यांनी आयोजित पत्रकार परिषदेत माहिती दिली.
याबाबत सविस्तर माहिती अशी की, आरोपी प्रशांत पोपटराव मोरे (वय-47 वर्षे रा. माळेगाव कारखाना शिवनगर ता. बारामती जि.पुणे) याने त्याचे टोळीतील इतर सदस्य यांना बरोबर घेवून संघटीत गुन्हेगारी संघटनेच्या माध्यमातुन स्वतःचे व संघटनेचे वर्चस्व राखण्यासाठी व आर्थिक लाभासह इतर लाभ संपादीत करणेसाठी संघटीतपणे गंभीर हिंसाचार करून त्याकरता घातक शस्त्राचा वापर करून हा गुन्हा झाल्याने सदर गुन्हयास महाराष्ट्र संघटीत गुन्हेगारी नियंत्रण अधिनियम सन 1999 चे कलम 3(1) (खख),3(4) हे वाढीव कलम लावणेबाबतचा प्रस्ताव बारामती तालुका पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक महेश ढवाण, पुणे ग्रामीणचे पोलीस अधिक्षक डॉ.अभिनव देशमुखयांचे मार्फतीने कोल्हापूर परीक्षेत्र कोल्हापूरचे विशेष पोलीस महानिरीक्षक मनोज लोहीया यांचेकडे प्रस्ताव पाठविण्यात आला होता. सदर प्रस्तावास 14 जून 2021 रोजी कोल्हापूर परीक्षेत्र कोल्हापूरचे विशेष पोलीस महानिरीक्षक मनोज लोहीया यांनी मंजुरी दिली आहे. सदर गुन्हयास महाराष्ट्र संघटीत गुन्हेगारी नियंत्रण अधिनियम सन 1999चे कलम 3(1)(खख), 3(4) (मोक्का) हे वाढीव कलम लावण्यात आलेले आहे.
यातील आरोपी प्रशांत पोपटराव मोरे यांचेवर 9 गुन्हे, विनोद उर्फ टॉम पोपटराव मोरे याचेवर 7 गुन्हे, राहुल उर्फ रिबल कृष्णांत यादव मोरे याचेवर 2 गुन्हे, आकाश मोरे (विधी संघर्षग्रस्त बालक) यांचेवर 1 गुन्हा दाखल असुन सर्व रा.माळेगाव बुदुक ता. बारामती जि. पुणे यांचेवर बारामती तालुका व परिसरात खुन, खुनाचा प्रयत्न, जबरी चोरी अशा स्वरूपाचे 09 गुन्हे संघटितपणे केल्याचे निष्पन्न झालेले आहेत. सदर गुन्हयाचा तपास श्री नारायण शिरगावकर उपविभागीय पोलीस अधिकारी बारामती उपविभाग हे करीत आहेत.
सदरची कारवाई पुणे ग्रामीणचे पोलीस अधिक्षक डॉ. अभिनव देशमुख, बारामती अपर पोलीस अधिक्षक मिलींद मोहीते, उपविभागीय पोलीस अधिकारी नारायण शिरगावकर, बारामती तालुका पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक महेश ढवाण, पोलीस हवालदार सुरेश भोई, पोलीस नाईक सुरेश दडस व पोलीस नाईक परिमल मानेर यांनी केलेली आहे.
गुन्ह्याची हकीकत….
बारामती तालुका पोलीस स्टेशन हददीमध्ये 31 मे 2021 रोजी सायंकाळी 6/45 या सुमारास मौजे माळेगाव जायचे हृददीत संभाजीनगर येथे राष्ट्रवादी पक्षाचे कार्यकर्ते रविराज तावरे यांचेवर कोणीतरी अज्ञात इसमांनी गोळीबार केला असल्याचे समजल्याने लागलीच सदर घटनेची माहीती पुणे ग्रामीणचे पोलीस अधिक्षक डॉ.अभिनव देशमुख, अपर पोलीस अधिक्षक मिलींद मोहिते, उपविभागीय पोलीस अधिकारी नारायण शिरगावकर यांना तात्काळ देत आम्ही स्वतः पोलीस अधिकारी व पोलीस स्टाफसह तात्काळ घटनास्थळी रवाना झालो त्यावेळी जखमी रविराज तावरे यांना तेथे जमलेल्या लोकांनी बारामती हॉस्पीटल येथे उपचारकामी नेल्याचे समजले त्यावेळी पोलीस अधिक्षक यांनी आम्हाला तपासासंदर्भात सुचना दिल्या व त्यांनी वेगवेगळी पथके बनवण्यासंदर्भात सुचना दिल्या त्याप्रमाणे आम्ही सहा. पोलीस निरीक्षक लंगुटे, पोलीस उपनिरीक्षक मोहीते यांच्या टीम बनवुन गुप्त बातमीदारामार्फत मिळालेल्या बातमीनुसार त्यांना रवाना केले सदरचे आरोपी उरळीकांचन येथे असल्याची खात्रीलायक बातमी मिळाल्याने सदर ठिकाणी आम्ही स्वतः व डी बी स्टाफ तसेच पोलीस उपनिरीक्षक मोहीते, पो.कॉ.नितीन चव्हाण, पो.कॉ.नितीन कोयळे असे आम्ही सदर आरोपीना ताब्यात घेथुन पोलीस ठाण्यात आणले त्यामधील एक आरोपी अल्पवयीन असुन दुसरा आरोपी हा माळेगावचा राहणारा असून त्याचे नाव राहुल उर्फ रिबेल यादव असल्याचे समजले त्यानंतर फिर्यादी सौ रोहीणी रविराज तावरे यांनी सांगितल्याप्रमाणे सदर घटनेचा आरोपी प्रशांत मोरे यास स्थानिक गुन्हे अन्वेषण विभाग, पुणे ग्रामिण यांनी ताब्यात घेतले याघटनेमध्ये फिर्यादी या पुणे जिल्हा परिषद सदस्या असून त्यांनी केलेल्या विकास कामाचा रोष मनात धरून फिर्यादी यांचे कार्यकर्तेना वारंवार धमकाविण्याचा प्रयत्न करून राजकीय व आर्थिक फायदा मिळविणेचे हेतुने फिर्यादीचे पती यांना संपवुन त्यायोगी दहशत माजविणेचे हेतने कट रचुन आपले अल्पवयीन मुलामार्फत फिर्यादीचे पती यांना जिवे ठार मारण्याच्या उद्देशाने अग्निशस्त्राद्वारे गोळी घालुन जिवे मारण्याचा प्रयत्न केला आहे. त्यामध्ये फिर्यादी यांचे पती रविराज तावरे उर्फ चिकु पाटील जखमी झाले आहेत. सदर इसमांचे विरुद्ध बारामती तालुका पोलीस स्टेशन येथे भादंवि कलम 307, 120(ब)504,506 आर्म ऍक्ट 3(25),(27),4(25) अन्वये गुन्हा नोंद करण्यात आला आहे. यातील आरोपी प्रशांत मोरे, विनोद उर्फ टॉम मोरे, राहुल उर्फ रिबल यादव, व एक अल्पवयीन मुलगा असल्याने त्यांना गुन्हा घडलेपासुन तासात बारामती तालुका पोलीसांनी ताब्यात घेतले आहे.