कितीही कायदे कडक केले तरी अनुसूचित जाती जमातींवर सवर्णांकडून अन्याय, अत्याचारच!

फलटण पोलीस स्टेशनला भाऊराव पाटील यांच्यावर गुन्हा दाखल : महिला पोलीस कर्मचार्‍याला सुद्धा भाऊराव पाटलाने दिल्या जातीवरून शिवीगाळ

फलटण(वार्ताहर): फुले,शाहु, आंबेडकरांच्या पुरोगामी महाराष्ट्रात अनुसूचित जाती जमातींवर अन्याय, अत्याचार होऊ नये म्हणून कितीही कायदे कडक केले तरी आजही अन्याय सहन करावाच लागत आहे.

असाच प्रकार फलटण येथे घडला असून अनुसूचित जाती जमातीतील महिलेला जातीवाचक व लज्जा उत्पन्न होईल असे कृत्य केल्याने भाऊराव पाटील(पूर्ण नाव माहित नाही) व यादव नामक महिला या दोघांवर भा.द.वि. कलम 354अ(1)(खखख), 504,506,34 व माहिती तंत्रज्ञान (सुधारणा) अधिनियम 2008 तसेच अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमाती (अत्याचार प्रतिबंधक) अधिनियम, 1989 नुसार फलटण पोलीस स्टेशन येथे फिर्यादी महिलेने दिलेल्या तक्रारीनुसार दि.15 जून 2021 रोजी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

या बहाद्दर पाटलाने फलटण पोलीस स्टेशनच्या महिला पोलीस कर्मचार्‍याला सुद्धा अश्लील शिवीगाळ करून जातीवाचक अपशब्द वापरले असल्याचे सोशल मिडीयावर रेकॉर्डींग फिरत आहे. सदरचे रेकॉर्डींग ऐकल्यावर महार जातीबाबत किती चिड या पाटलाच्या मनात, अंगात भरलेली आहे हे दिसते.

याबाबत सविस्तर माहिती अशी की, फिर्यादी अनुसूचित जाती जमातीतील असून, बारामती येथील पारस कंपनीत हेल्पर म्हणून काम करीत आहे. फिर्यादीच्या घराशेजारी गेल्या दहा वर्षापासून राहत असणार्‍या यादव महिला ही फिर्यादीची मैत्रीण आहे. मैत्रिण भाऊराव पाटील नावाच्या इसमाबरोबर पळून गेल्याचे मैत्रिणीच्या पतीनेच फिर्यादीस सांगितले. फिर्यादीस मैत्रिण या नात्याने वेळोवेळी फोन, मेसेज करीत होती. मैत्रिणीचे कल्याण व्हावे या हेतूने फिर्यादीने तू तुझ्या कुटुंबासोबत राहिला जा तुला दोन मुले आहे असे वारंवार सांगत होती. मात्र, फिर्यादीचे सांगणे तिला पटत नसल्याने तिने फोन, मेसेज करणे सोडून दिले होते.


दि.9 जून रोजी मैत्रिणी व पाटील हे दोघे फिर्यादीच्या घरी गेले तेथुन फिर्यादीचा नंबर घेऊन फिर्यादीस मेसेज केला मी तुला कॉल करू का? फोन केल्यावर मी खूप अडचणीत आहे मला तुझ्याशी बोलायचे आहे आपण भेटूया म्हणून ते दोघे दि.11 जून रोजी पाहुणेवाडी येथील रोडवरील चिंचेचे बागेत भेटले. यादव मैत्रिण म्हणाली मला तुझी गरज आहे तु मला मदत कर तुझ्या नावावर मला रूम घेवून दे असे म्हणाली मात्र फिर्यादीने मदत करण्यास नकार दिला.

त्यानंतर दि.12 जून रोजी रात्रौ.9 वा. फिर्यादी व फिर्यादीची आई घरासमोर उभे असताना त्याठिकाणी यादव व भाऊराव पाटील मोटार सायकलवरून आले व फिर्यादीचा भाऊ सिद्धार्थ (बापट) याचा फोन नंबर मागू लागले. फिर्यादीने नंबर देण्यास नकार दिला असता भाऊराव पाटील व मैत्रिण यादव या दोघांनी माझ्या महार जातीवरून शिवीगाळ करून जीवे मारण्याची धमकी दिली. यावेळी शेजारी राहणारे आकाश रामदास निंबाळकर व सुनिल उत्तम सरतापे यांनी सदरचा प्रकार पाहिला असून त्यांच्या मध्यस्थीनंतर दोघे निघून गेले. भाऊराव पाटील याने पुन्हा 9.51 मि. फिर्यादीस फोन करून पुन्हा जातीवाचक शिवीगाळ केली. मैत्रिण यादव हिने पुन्हा 10.16 मी. फोन करून सोमवारपेठ मध्ये जाधव यांचे घरी ये असे सांगितले. सदरचा प्रकार फिर्यादीने त्याचा भाऊ सिद्धार्थ यास सांगितला. सिद्धार्थने दि.9 जून रोजी कोळकी ग्रामपंचायत समोर फिर्यादीच्या आईने यादव हिस पल्स पॉलिसीची पैसेची विचारणा केली असता सोबत असलेल्या भाऊराव पाटील याने आईला जातीवाचक शिवीगाळ केल्याचे सांगितले.

दि.14 जून रोजी रात्रौ.10चे सुमारास भाऊराव पाटील याने फिर्यादीच्या मोबाईलवर ट्रुकॉलर ऍपवरून घाणेरडे व अश्लिल मेजेस पाठविले. दि.15 जून रोजी सकाळी 9.30 वा. याच ऍपवरून अश्लील व्हिडिओ सुद्धा पाठविला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Don`t copy text!