बारामती(वार्ताहर): अनेकान्त एज्युकेशन सोसायटीच्या तुळजाराम चतुरचंद महाविद्यालयात जिमखाना विभाग व राष्ट्रीय सेवा योजना यांच्या संयुक्त विद्यमाने जागतिक पर्यावरण दिन साजरा करण्यात आला. जगभरात 5 जून रोजी जागतिक पर्यावरण दिन साजरा करण्यात येतो. या दिनाचे औचित्य साधत महाविद्यालयाच्या क्रिडांगण आवारात बकुळाच्या 25 रोपांचे वृक्षारोपण करण्यात आले.
महाविद्यालयाच्या क्रीडांगणावर महाविद्यालयाचे प्राचार्य मा.डॉ. चंद्रशेखर मुरूमकर यांच्या अध्यक्षतेत, राहुल शहा (वाघोलीकर) यांच्या हस्ते हे वृक्षारोपण करण्यात आले. संयुक्त राष्ट्र पर्यावरण कार्यक्रम (युएनईपी) ने यंदाच्या 2021 वर्षासाठी ’परिसंस्था पुनर्संचयित करणे’ ही थीम जाहीर केली आहे. या अंतर्गत पुन्हा एकदा पृथ्वीला चांगल्या स्थितीत आणणे. जगाच्या पर्यावरणातील परिसंस्था पुनर्संचयित करण्याच्या कार्यांवर जोर दिला जाईल. नैसर्गिक प्रतिसादांवर आणि उदयोन्मुख हिरव्या तंत्रज्ञानावर जोर देण्यात येणार आहे.
या कार्यक्रमासाठी महाविद्यालयाचे उपप्राचार्य डॉ.अविनाश जगताप, डॉ. अजित तेळवे, डॉ.जगदीश देशपांडे, डॉ.सीमा गोसावी, जिमखाना विभागाचे डॉ. गौतम जाधव, प्रा. अशोक देवकर, राष्ट्रीय सेवा योजनेचे डॉ. विलास कर्डीले, प्रा. लांडगे तसेच एन. एस. एस. व क्रीडाविभागाचे विद्यार्थी प्रतिनिधिक स्वरूपात उपस्थित होते.