नटराज नाट्य कला मंडळ हे सांस्कृतिक क्षेत्राबरोबर सामाजिक क्षेत्रात उल्लेखनिय काम करीत आलेले आहे. जागतिक कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव वाढू नये म्हणून लॉकडाऊन काळापासून ते आजपर्यंत नागरीकांमध्ये जनजागृती व मदतीचा हात देणारी संस्था म्हणून गणली जावू लागली आहे. नटराज नाट्य कला मंडळाचे संस्थापक अध्यक्ष किरण गुजर व त्यांच्या सर्व सहकारी टीमने कोव्हीड-सेंटर उभारून त्याचे व्यवस्थापन करण्याचा निर्णय घेतला आहे. या निर्णयामुळे रूग्णांमध्ये विशेषत: बारामतीकरांमध्ये एक प्रकारे आत्मविश्र्वास व धीर आलेला दिसत आहे.
संपूर्ण जगात कोरोना रूग्णांची होत असलेली परिस्थिती पाहता, कित्येक रूग्ण धास्ती, भितीपोटी आपला जीव गमविलेला आहे. त्याच धर्तीवर बारामतीकरांना आपलेसे वाटावे व रूग्णांची हेळसांड होऊ नये म्हणून पॉझिटीव्ह रूग्णामधील लक्षणे नसलेले (असिमटेमेटीक) रूग्णांचे व्यवस्थापन करण्याचा खुप मोठा निर्णय घेतला आहे. डॉ.बाबासाहेब आंबेडकर मुलांचे वसतीगृहामध्ये 100 रूग्णांचे व्यवस्थापन करण्यात येणार आहे. या व्यवस्थापनाची रूपरेषा पाहिल्यानंतर रूग्णांमध्ये दिलासा मिळणार आहे.
या ठिकाणी रूग्ण आलेनंतर त्यांची स्वागत कक्षामध्ये रितसर नोंद केली जाईल.ज्येष्ठ रूग्ण पहिला मजला व इतर रूग्ण दुसर्या मजल्यावर पाठविण्यात येईल. दररोज सकाळी 8 ते 2, दुपारी 2 ते रात्री 8 व रात्री 8 ते सकाळी 8 या वेळेत 3 डॉक्टर व 2 नर्सेस उपस्थित असतील. डॉक्टरांकरीता तळमजल्यावर स्वतंत्र्य कक्ष निर्माण केलेला आहे. डॉक्टर रूग्णांची तपासणी करून नोंदी ठेवतील व सिस्टर सकाळ-दुपार व संध्याकाळची वेळेवर औषधे देण्याचे काम करतील. प्रत्येक रूग्णास स्वतंत्र बेड, गादी-उशी, सकाळचा चहा-नाष्टा, दुपारचे जेवण, रात्रीचे जेवण दिले जाणार आहे. रूममध्ये मच्छर अगरबत्ती, काडीपेटी, मेणबत्ती, कपडा ठेवला आहे. जेवण झाल्यानंतर रूग्णाने डिस्पोजेबल ताट रूमबाहेर ठेवलेल्या डस्बीनमध्ये टाकण्यासाठी सोय केलेली आहे. रूग्णांस तातडीची मदत हवी असल्यास, प्रत्येक मजल्यावर इंटरकॉम फोन ठेवण्यात आला आहे. त्याद्वारे ते मदत मागू शकतील. स्वागत कक्षातील व्यक्ती त्या पुरवू शकेल. रूग्णाची दररेजची माहिती एस.एम.एसद्वारे नातेवाईकांना दिली जाणार आहे. दररोज वृत्तपत्र, केबल टी.व्ही.ची सोय केलेली आहे. स्वागत कक्षात जमा झालेली रूग्णांची माहिती शासकीय रूग्णालयात पाठविण्यात येणार आहे.
रूग्णास जादा उपचाराची रुग्णास जादा उपचाराची आवश्यकता असल्यास त्यांना रुग्णवाहिकेमधून सिल्व्हर ज्युबिली हॉस्पीटल, रुई ग्रामीण रुग्णालय अगर मागणीप्रमाणे खाजगी रुग्णालयात पाठविण्याची व्यवस्था रूग्णवाहिके मार्फत केली जाणार आहे. त्याकरीता एक ऍब्युलन्स उपलब्ध करुन ठेवली आहे. रुग्णाच्या खोल्या व स्वच्छतागृह दररोज स्वच्छता करण्याची व्यवस्था व दररोजचा गोळा होणारा कचरा मेडीकल प्रक्रिया करण्यासाठी पाठविण्यात येणार आहे. कोव्हिड केअर सेंटरची सर्व व्यवस्थापन नटराज नाट्य कला मंडळाचे कार्यकर्ते तत्पर व दक्ष झालेले आहेत. या स्वागतकक्षात स्वतंत्र्य फोन नंबर 8180973944 ठेवण्यात आलेला आहे. यावर रूग्णांना माहिती दिली जाणार आहे.
समाजामध्ये कोरोना विषाणूची इतकी भिती निर्माण झालेली आहे की, सख्ख्या भावाला किंवा नातेवाईक कोरोना बाधीत झाले किंवा दुर्देवी त्यांचा मृत्यू झाला तर अंत्यविधीलाही न येण्याची उदाहरणे समोर येत आहेत. नटराज नाट्य कला मंडळाच्या वतीने बारामती गणेश फेस्टिव्हल साजरा न करता कोरोना बाबतची भिती व गैरसमज याबाबत मंडळाने नम्र निवेदन प्रसिद्ध केले होते ते प्रत्येकाच्या घरात जावून देण्याचे काम मंडळाच्या कार्यकर्त्यांनी केलेले आहे. कोरोनाची भिती न बाळगता चुकीची माहिती, भ्रामक कल्पना, भिती व अज्ञानपणेला दूर ठेवा. वेळ कोणावरही येऊ शकते आपल्या शेजारी, नातेवाईकांना धीर देण्याचे काम करा. तुम्ही दिलेला धीर त्याचा आत्मविश्र्वास वाढवू शकतो. एकमेकांना आधार दिला तरच आपली समाज व्यवस्था टिकून राहणार आहे. नटराज संस्थेने उचललेल्या पावलाचे अनुकरण इतरांनी करावे म्हणजे या सामाजिक योगदानातून सर्वांचा हातभार लागेल व आपण लवकर या विषाणूला हरवू शकू!