देसाई इस्टेट मधील महिलांच्या वतीने तेजस पांढरे चा सन्मान

बारामती (वार्ताहर): केंद्रीय लोकसेवा आयोगच्या (MPSC) परिक्षेमध्ये उत्तीर्ण होऊन CAPF हे पद मिळवून देशात 46 वा रँक मिळवलेल्या तेजस पांढरे यांचा सत्कार देसाई इस्टेटमधील श्री गणेश तरुण मंडळ व राजे छत्रपती प्रतिष्ठान आणि देसाई इस्टेट मधील महिला ग्रुपच्या वतीने करण्यात आला.

या प्रसंगी सौ.अनिता घुले, सौ.स्वाती नवसारे, सौ. अरुणा हेडे, सौ.सुजाता सूर्यवंशी, सौ.मनीषा निकम, सौ.प्रमिला रणनवरे, सौ.आरती नवसारे, सौ. गौरी सावळेपाटील,सौ.पद्मजा खताळ, सौ.मंदा गवारे, सौ.वंदना वाघ, सौ.सुजाता जगदाळे, सौ. शारदा मोहिते व श्रीमती पुतळाबाई ठोंबरे इ.महिलांनी पुष्पगुच्छ देवून सत्कार केला.

देसाई इस्टेट मधील शिक्षक दाम्पत्य सुरेश पांढरे व संगीता पांढरे यांचे चिंरजीव तेजस आहे. रहिवाशी माता-भगिनी, ज्येष्ठ-तरुण वर्गाने निवडीबदल केलेला सत्कार नेहमी जीवनात सकारत्मक ऊर्जा देईल व घरचा सत्कार महत्वपूर्ण असून आई वडील, शिक्षक व देसाई इस्टेटचे नाव नेहमी उज्ज्वल करण्याचा प्रयत्न करेल असे प्रतिपादन तेजस पांढरे यांनी दिले. कार्यक्रमाचे आयोजन हेमंत नवसारे, राहुल वायसे यांनी केले होते. यावेळी डॉ.ज्ञानेश्वर घुले, श्यामराव मोहिते, बापूराव जगदाळे, सूर्यवंशी आदी मान्यवर उपस्थीत होते. शेवटी आभार हेमंत नवसारे यांनी मानले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Don`t copy text!