बारामती(वार्ताहर): बारामती नगरपरिषदेचे आरोग्य निरीक्षक राजेंद्र सोनवणे यांचा महाराष्ट्र राज्यस्तरीय स्वच्छता निरीक्षक संवर्गातील पदावर महाराष्ट्र शासन नगरपरिषद प्रशासन संचालनालयाने दि.16 मार्च रोजी काढलेल्या आदेशान्वये समावेश करण्यात आला आहे. सोनवणे यांनी गेल्या वर्षी सदर विकल्प भरून दिलेला होता.
सेवा शर्ती नियम 7 (2) मधील तरतुदीनुसार पर्याय निवडण्यासाठी समावेश झालेपासून दोन महिन्याच्या कालावधीत लेखी स्वरूपात आयुक्तांना नियुक्ती प्राधिकारी यांना कळविण्याचा आहे. यामध्ये पाच नगरपरिषद निवडावयाचे आहेत यामध्ये सोनवणे यांनी बारामती यास प्राधान्य दिलेले आहे. या समावेशामुळे श्रेणी, वेतनश्रेणी, भविष्य निर्वाह निधी इ. वाढ होणार आहे. या समावेशामुळे सर्वत्र त्यांचे अभिनंदन होत आहे. बारामती नगरपरिषद आपली नगरपरिषद मानून त्यांनी आजपर्यंत नागरीकांची दर्जेदार सेवा करीत आलेले आहेत. नागरीकांच्या हाकेला धावणारे आरोग्य निरीक्षक म्हणून त्यांची वेगळी ओळख आहे. कोविड काळात त्यांनी केलेले अभूतपूर्व काम वाखण्याजोगे आहे. असे कर्तव्यदक्ष आरोग्य निरीक्षक पुन्हा बारामतीलाच लाभावे अशी नागरीकांमधून बोलले जात आहे.