अत्यावश्यक सेवा वगळून इतर आस्थापना सुरू ठेवल्याने चायनिज गाड्यावर कारवाई

बारामती(वार्ताहर): अत्यावश्यक सेवा वगळून इतर आस्थापना सुरू ठेवल्याने महात्मा फुले चौक येथील चायनिज गाड्यावर पोलीस पेट्रोलिंग करीत असताना किशोर धनंजय माने यांच्यावर बारामती शहर पोलीस स्टेशनला गु.र.नं.178/2021 भा.द.वि. कलम 188,269, 290 सह साथीचे रोख अधिनियम 2,3,4 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलीस नाईक रामचंद्र शिंदे यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अशा प्रकारे आणखीन पाच गुन्हे दाखल करण्यात आले असल्याचे बारामती शहर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक नामदेव शिंदे यांनी कळविले आहे.

याबाबत सविस्तर माहिती अशी की, दि.12 मार्च रोजी पोलीस कर्मचारी पेट्रोलिंग करीत असताना जिल्हाधिकारी यांनी पुणे जिल्हा व कार्यक्षेत्रात रात्री 10 नंतर अत्यावश्यक सेवा वगळून इतर सर्व आस्थापना बंद ठेवण्याचे आदेश दिलेले आहेत. मात्र, काही हॉटेल चालक तसेच आस्थापना सुरू ठेवून गर्दी करून कोविड-19 या आजारांचे संक्रमण वाढवण्यास जाणून-बुजून एक प्रकारे हातभार लावत असल्याचे निदर्शनास आल्याने तसेच या गाड्यावर पाच ते सहा इसम विनामास्क गर्दी करून उभे होते. जिल्हाधिकारी यांनी दिलेल्या आदेशाची अवज्ञा करून लोकांच्या जिवीतास धोका निर्माण होईल हे माहीत असताना संसर्गजन्य रोग पसरण्याची हयगयीची कृती करून सार्वजनिक ठिकाणी चायनीजच्या गाडा वेळेपेक्षा जास्त वेळ सुरू ठेवल्याने गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Don`t copy text!