बारामती(वार्ताहर): स्व.माणिकबाई चंदूलाल सराफ ब्लड बॅकेने बारामतीत रक्ताचा तुटवडा निर्माण झाल्यामुळे केलेल्या आवाहनास प्रतिसाद देत येथील बारामती तालुका बॅडमिंटन असोसिएशन व जिल्हा क्रीडा संकुल बारामती यांच्या संयुक्त विद्यमाने रक्तदान शिबीर आयोजित करण्यात आले होते या वेळी 35 रक्तदात्यांनी रक्तदान करून दिला प्रतिसाद.
येथील इंडियन रेड क्रॉस सोसायटी संचलित स्व.माणिकबाई चंदूलाल सराफ ब्लड बँक बारामती यांनी रक्त संकलन केले यावेळी बँकेचे वैद्यकीय अधिकारी डॉ.ए.बी.बारवकर यांनी उपस्थितांना रक्तदाना विषयी मार्गदर्शन केले. तर स्पोर्टस अकॅडमी, कराटे असोसिएशन, जिल्हा क्रीडा संकुल जिम, पवार स्पोर्ट्स असोसिएशन, विद्या प्रबोधिनी करियर अकॅडमी, एबीसीडी डान्स व स्पोर्ट्स झुम्बा अकॅडमी बारामती तसेच सर्व खेळाडू व प्रशिक्षक यांनी रक्तदान शिबीर यशस्वी होण्यसाठी परिश्रम घेतले.
यावेळी रक्तदात्यांसाठी पाण्याची व्यवस्था भाजपाचे तालुका अध्यक्ष पांडुरंग कचरे यांनी केली तर अल्पोउपाहाराची व्यवस्था डॉ.तुषार गदादे, सचिन सावंत यांनी तर प्रत्यक रक्तदात्यास रक्तदानानंतर एक वृक्ष देण्यात आले त्याची व्यवस्था विक्रम निंबाळकर व दीपक काटे यांनी केली.