संकटात बरोबर आहोत…

लसीकरणाचा वेग वाढविण्यासाठी राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी पंतप्रधानांना विनंती केली ती विनंती मान्य करून पंतप्रधानांनी लस उत्पादन करू शकणार्‍या संस्थांना पाठबळ व प्रोत्साहन देण्यात येईल असे सांगितले यावरून जागतिक संकटात हम मिलकर काम करेंगे हे दिसून आले.

राज्यातील वाढत्या कोविड संसर्गाच्या अनुषंगाने केंद्र सरकारने पंतप्रधानांच्या अध्यक्षतेखाली दूरदृश्य प्रणालीद्वारे बैठकीचे आयोजन केले होते. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी यावेळी महत्वाच्या मुद्द्यांवर लक्ष वेधले. दररोज 3 लाखांपर्यंत लसीकरण करण्याचा प्रयत्न केला जाणार आहे.

लसीकरणाच्या बाबतीत महाराष्ट्राचे काम समाधानकारक आहे असे आज सादरीकरणाच्या दरम्यान आरोग्य सचिवांनी सांगितले. महाराष्ट्रात आज सरासरी प्रत्येक दिवशी 1 लाख 38 हजार 957 डोस देण्यात येतात. इतर काही प्रमुख राज्यांच्या तुलनेत हे प्रमाण समाधानकारक आहे मात्र ते आणखीही वाढवावे असे सांगण्यात आले. राज्याने आरटीपीसीआर चाचण्या मोठ्या प्रमाणावर करण्यास सुरुवात केली आहे.

महाराष्ट्राने वेळोवेळी केंद्रीय पथकांनी दिलेले सल्ले व मार्गदर्शन याप्रमाणे कोविडची लढाई लढली आहे. मधल्या काही काळात तर दिवसाला 2 हजार रुग्णांपेक्षाही कमी रुग्ण आढळायला सुरुवात झाली होती मात्र आता काही जिल्ह्यांत ती संख्या खूप वेगाने वाढते आहे. महाराष्ट्र किंवा देशाच्या पश्चिमी भागातील राज्यांत अचानक झालेली ही मोठी वाढ संभ्रमात टाकणारी असून याविषयी तज्ञ, संशोधक यांनी प्रकाश टाकावा अशी विनंती मुख्यमंत्र्यांनी पंतप्रधानांना केली.

लसीचे दोन डोस घेतल्यावरही विशिष्ट कालावधी उलटून गेल्यावर कोरोना झाल्याच्या काही घटना मुख्यमंत्र्यांनी पंतप्रधानांच्या निदर्शनास आणल्या तसेच राज्यात पुढील काळात आम्ही मोठ्या प्रमाणावर लसीकरण आणि त्याजोडीनेच मास्क वापरत राहणे, सुरक्षित अंतर ठेवणे या आरोग्याच्या नियमांवर जास्तीत जास्त भर नागरीकांनी दिला पाहिजे. बाधितांमध्ये तरुण गट पण आहे हे लक्षात घेऊन 45 वर्षे वयोगटापासून पुढे सहव्याधी असो किंवा नसो, सर्वाना लसीकरण करावे. या बैठकीतून केंद्र व राज्य शासन फक्त आणि फक्त नागरीकांचा व रूग्णांचा विचार करीत असल्याचे दिसत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Don`t copy text!