पालकमंत्री पाणंद रस्ते योजनेतर्ंगत मौजे मेडद येथे जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांनी केले पाणंद रस्त्याचे उद्घाटन!

बारामती(उमाका): बारामती तालुक्यामध्ये पालकमंत्री पाणंद रस्ते योजनेअंतर्गत एकुण 189 किलोमीटर लांबीचे 133 रस्ते प्रस्तावित केले आहेत. या योजनेअंतर्गत आतापर्यंत 14 किमी लांबीचे 13 पाणंद रस्ते पूर्ण झाले आहेत.

जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांनी आज मौजे मेडद येथील पाणंद रस्त्याच्या कामाचे उद्घाटन केले. यावेळी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आयुष प्रसाद, उपविभागीय अधिकारी दादासाहेब कांबळे, तहसिलदार विजय पाटील, गटविकास अधिकारी राहूल काळभोर, तालुका आरोग्य अधिकारी डॉ. मनोज खोमने, मेडद गावचे सरपंच, उपसरपंच, मंडळ अधिकारी शबाना बागवान, तलाठी राहूल गुळवे आणि ग्रामस्थ उपस्थित होते.

पाणंद रस्त्याची सर्व कामे ही लोकसहभागातुन होणार असून ती माहे मे अखेर पर्यंत पूर्ण करावीत अशा सूचना जिल्हाधिकारी देशमुख यांनी दिल्या.

विशेष म्हणजे जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांनी स्वत: बैलगाडी हाकून आणि जेसीबी चालवून पाणंद रस्त्याच्या कामाची सुरुवात केल्याने अधिकारी वर्ग आणि ग्रामस्थ प्रोत्साहित झाले आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Don`t copy text!