बारामती(वार्ताहर): बारामती शहर पोलीस स्टेशनचे दक्ष पोलीस निरीक्षक नामदेव शिंदे व सहकार्यांच्या सतर्कतेमुळे 12 तासात अपहरण युवकाची सुटका झाली आणि कुटुंबियाचा जीव भांड्यात पडला. पोलीसांच्या दक्षतेमुळे अपहरण युवकाची सुटका झाल्याने सर्वत्र पोलीसांचे कौतुक होत आहे.
याबाबत सविस्तर माहिती अशी की, अपहरण युवक कृष्णराज उर्फ राज धनाजी जाचक (वय-18, रा.लिमटेक, ता.बारामती) यास दि.12 मार्च 2021 रोजी रात्रौ 7 ते 8.30 च्या दरम्यान पानसरे ग्रीन सिटी शेजारील मोकळ्या जागेत राज याचे मालकीची यमाहा दुचाकी क्र.एमएच-42, एवाय 7077 लावून जळोची रोड लगत पब्जी गेम खेळत थांबला असता, 4 अज्ञात इसमांनी राज यास पकडून काठीने डावे पायावरती लवणीत मारून त्यास जबरीने गाडीत बसवून नेले. व राजचा मित्र पृथ्वीराज चव्हाण याचा 9595546363 नंबरचा सॅमसंग ए-74 चा मोबाईल व दुचाकीची चावी देखील हिसकावून घेवून गेले असल्याचे मित्र पृथ्वीराज ज्ञानदेव चव्हाण (वय-24 वर्षे, रा.संभाजीनगर, सुर्यनगरी, बारामती) याने राजचे वडिल धनाजी जाचक यांना कळविले.
रात्रौ 9.30 च्या सुमारास धनाजी जाचक यांचे मोबाईलवर राजचा फोन आला की, काही मुलांनी मला मारहाण करून चारचाकी वाहनात बसवून डोळ्यावर पट्टी बांधून मला किडन्याप करून अज्ञात ठिकाणी आणले असल्याचे सांगितले. तो बोलत असताना त्यातील एका मुलाने मोबाईल हिसकावून तुझा मुलगा शाळेला पाचगणीला असताना एका मुलीला त्रास दिल्यामुळे तिने आत्महत्या केली आहे त्याची सुपारी आम्हाला मिळाली आहे. तू जर 5 कोट रूपये एक तासा दिले नाही तर तुझ्या मुलाला मुखशील असे बोलून फोन बंद केला.
हे ऐकताच धनाजी जाचक यांच्या पायाखालची वाळू सरकली मात्र, पोलीसांनी धीर देत बारामती शहर पोलीस स्टेशनला गु.र.नं.173/2021 भा.द.वि. कलम 364अ, 365, 384, 386,324 व 34 अन्वये गुन्हा दाखल केला.
सदरची सर्व हकीकत शहर पोलीस स्टेशनने पोलीस अधिक्षक, अपर पोलीस अधिक्षक व उपविभागीय पोलीस अधिकारी यांना कळवून त्यांचे मार्गदर्शन घेवून तातडीने उपलब्ध अधिकारी सपोनि वाघमारे, सपोनि दंडिले, पोसई निंबाळकर अशी चार पथके पोलीस अंमलदारासह वेगवेगळी तयार करून त्यांना मार्गदर्शन करून फिर्यादी व अपहारीत मुलगा राज याचे वडील धनाजी जाचक यांचे संपर्कात राहुन येणार्या मोबाईल फोनवरून फोन नंबर घेवून आरोपीचा ठावठिकाणा बाबत माहितीघेवून फलटण, दहिवडी परिसरात तपास करत माहिती गोळा करीत मोगराळे घाटामध्ये डोंगर दर्यातून रात्रीचे अंधारात 5.30 चे सुमारास इसम नामे सुनिल लक्ष्मण दडस (वय-26, रा.दुधेबावी, ता.फलटण), गौरव साहेबराव शेटे (वय-20, रा.वायेवाडी, खेड, ता.कर्जत) व कार चालक संतोष शरणाप्पा कुडवे (रा.चंदननगर, सर्वे 49, पुणे) यांना धाडसाने सामोरे जावून अंधरातून दरीमध्ये उतरून त्यांना ताब्यात घेवून अपहारीत मुलगा राज याची अलगद सुटका करून त्यासही सोबत घेवून त्याचेकडी टोयाटो कंपनी इटॉस कार पांढरे रंगाची पिवळी नंबरप्लेट एमएच-14, एचजी 7818 हिच्यासह सर्व कायदेशीर प्रकीया पार पाडून ताब्यात घेतले.
या कामगिरीत पोलीस अधिक्षक डॉ.अभिनव देशमुख, अपर पोलीस अधिक्षक मिलिंद मोहिते, उपविभागीय पोलीस अधिकारी नारायण शिरगावकर यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक नामदेव शिंदे, सपोनि प्रकाश वाघमारे, उमेश दंडिले, पोसई गणेश निंबाळकर, सहा.फौजदार संजय जगदाळे, पो.हवा.शिवाजी निकम, पो.ना.रूपेश साळुंखे, ओंकार सिताप, दादासाहेब डोईफोडे, पो.कॉ.तुषार चव्हाण, दशरथ इंगोले, जितेंद्र शिंदे तसेच सायबर पोलीस स्टेशन पुणे ग्रामीचे पो.कॉ.सुनिल कोळी, चेतन पाटील व पोलीस ठाण्यात प्राप्त घडामोडी प्राप्त होणारी माहिती पोलीस ठाणे अंमलदार पो.ना. भगवान थोरवे, मदतनीस पो.कॉ. रणजीत देवकर, पो.हवा.गोपाळ ओमासे, पो.कॉ.अतुल जाधव अशा टीमचा सहभाग झालेला आहे.