वाटले होते, दुचाकी चोरून लपू कशाच्या तरी आड! पोलीसांच्या सापळ्यात अडकला चोर, केला गजाआड!!

बारामती(वार्ताहर): बारामती शहर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक नामदेव शिंदे यांचे मार्गदर्शनाखाली सहा.फौजदार संदीपान माळी व डी.बी.पथकाने मळद येथे सापळा लावून मोटारसायकल चोर शंकर उर्फ पोक्या प्रकाश आडके (वय-26 वर्षे, रा.मळद, ता.बारामती) यास ताब्यात घेतले.

आरोपीकडून आठ मोटार सायकली हस्तगत करण्यात आल्या असुन बारामती शहर पोलीस स्टेशनचे 6 गुन्हे, बारामती तालुका पोलीस स्टेशनचा 1 गुन्हा, भिगवण पोलीस स्टेशनचा 1 गुन्हा असे चोरीचे गुन्हे दाखल आहेत. आरोपीने आणखी दोन मोटार सायकल चोरीबाबत कबुली दिली असुन त्याच अनुशंगाने अधिक तपास चालु आहे

दि.11 मार्च 2021 रोजी बारामती शहर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक नामदेव शिंदे यांना गुप्त बातमीद्वारामार्फत खात्रीशीर बातमी मिळाली की, आरोपी बारामती शहरातल्या मोटार सायकाली चोरी करीत असुन तो आज रोजी मेडद येथे आलेला आहे. त्याचेकडे सध्या चोरीची मोटार सायकल आहे असल्याची माहिती मिळाली होती. आरोपीस ताब्यात घेतेवेळी त्याच्या ताब्यात असणार्‍या डिस्ककव्हर मोटार सायकल बाबत विचारणा केली असता त्याने सदरची मोटर सायकल ही समर्थनगर बारामती येथुन चोरी केली असलेबाबत सांगितले. त्यानुसार पोलीस स्टेशन अभिलेखावर गुन्हा दाखल असले बाबत खात्री झाल्याने आरोपीस अधिक विश्र्वासात घेवुन चौकशी केली असता त्याने बारामती शहर पोलीस स्टेशन, बारामती तालुका पोलीस स्टेशन,भिगवण पोलीस स्टेशन हददीतुन मोटार सायकल चोरल्याचे सांगितले.

सदरची कामगीरी पोलीस अधिक्षक डॉ.अभिनव देशमुख, अप्पर पोलीस अधिक्षक मिलीद मोहीते, उपविभागीय पोलीस अधिकारी नारायण गिरगावकर व पोलीस निरीक्षक नामदेवराव शिंदे यांचे मार्गदर्शनाखाली सहा पोलीस निरीक्षक प्रकाश वाघमारे सहा.फोजदार शिवाजीराव निकम, संजय जगदाळे, पोलीस नाईक दादासाहेब डोईफोडे, ओंकार सिताप, रूपेश साळुंके, पोलीस कॉ. दशरथ इंगोले, तुषार चव्हाण, अकबर शेख यांनी केली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Don`t copy text!