पोलीस निरीक्षकांकडून सामाजिक कार्यकर्त्यास दमदाटी व शिवीगाळ : दलित चळवळीत असंतोष

बारामती(वार्ताहर): बारामती शहर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक नामदेव शिंदे यांनी ब्ल्यू पँथर सामाजिक विकास प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष व वंचित बहुजन आघाडीचे पदाधिकारी मंगलदास तुकाराम निकाळजे यांना दमदाटी व शिवीगाळ केल्याने याबाबत दलित चळवळीत असंतोष निर्माण झाला आहे.

दि.10 मार्च 2021 रोजी रात्रौ. 8.30 ते 10 च्या सुमारास हातगाडी धारकांवर केलेल्या कारवाईबद्दल मंगलदास निकाळजे व हातगाडी धारकांसह गेले होते. श्री.शिंदे यांनी एकही शब्द बोलण्या अगोदरच संबंधित हातगाडीवाल्यांची तक्रार न ऐकता आपल्या पदाचा गैरवापर करीत खालच्या पातळीवर शिवीगाळीची भाषा वापरत औकातीत रहायचे असे म्हणत धमकावत मंगलदास निकाळजे यांचे विरूद्ध शत्रुत्वाची भावना व्यक्त करत सर्व लोकांसमोर अपमानीत करून चार चौघात पानउतारा करत पोलीस स्टेशन मधून हाकलुन दिले असल्याचे आयोजित पत्रकार परिषदेत मंगलदास निकाळजे, अनिकेत मोहिते, अक्षय शेलार व अखिल बागवान यांनी सांगितले.
मंगलदास हे दलित समाजातील मागासवर्गीय समाजाचे आहेत ते नेहमी अन्याया विरोधात आवाज उठवतात हे माहित असताना त्यांच्यावर दहशत बसवून त्यांना लोकांमध्ये अपमानीत केले. पुन्हा कोणतेही काम करू नये व अन्यायग्रस्त त्यांच्यापर्यंत पोहचू नये या हेतूने अपमानीत केले असल्याचे त्यांनी सांगितले.

या सर्व घटनेची व्हिडिओ रेकॉर्डींग मंगलदास यांचेकडे आहे ते योग्य वेळी सादर करतील तत्पूर्वी पोलीस स्टेशनमध्ये बसविण्यात आलेल्या सी.सी.टी.व्ही कॅमेर्‍याची पाहणी करून संबंधित अधिकार्‍यावर कायदेशीर कारवाई करणेची मागणी मंगलदास निकाळजे यांनी वरिष्ठ पोलीस अधिकार्‍यांकडे तक्रारीद्वारे केलेली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Don`t copy text!