सुनील शिंदे यांना डॉ.आंबेडकर नॅशनल एक्सलन्स अवार्ड

बारामती(वार्ताहर): येथील रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे पुणे जिल्हा सचिव तसेच साप्ताहिक बहुजन हितार्थचे संपादक धडाडीचे सामाजिक कार्यकर्ते, सुनील श्रावण शिंदे यांना नवी दिल्ली न्यू महाराष्ट्र सदन येथे आयोजित कार्यक्रमात केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री नामदार रामदास आठवले व मान्यवरांच्या शुभहस्ते भारतरत्न डॉ.बी.आर. आंबेडकर नॅशनल एक्सलन्स अवार्ड सन्मानपूर्वक देण्यात आला.

राष्ट्रीय गौरव सन्मान 2021 या उपक्रमात नॅशनल युथ अवार्ड फेडरेशन ऑफ इंडिया डॉ. विशाखा सोशल वेलफेअर फाउंडेशन रजि. यांच्या वतीने आयोजित ग्लोबल कोनक्लू 2021, नॅशनल कॉन्फरन्स ऑफ आत्मनिर्भर भारत या कार्येक्रमात सदरील निवड करण्यात आली.

शिंदे हे गेले वीस वर्षापासून नामदार रामदास आठवले यांच्या नेतृत्वाखालील रिपब्लिकन पक्षात क्रियाशील कार्यकर्ते म्हणून सर्वपरिचित असून बहुजन हितार्थचे संपादक आहेत.

गोरगरिबांच्या अनेक अडीअडचणीला सामोरे जाऊन मदत करणे, अनेक प्रकारच्या सामाजिक कार्यक्रमात उपक्रमात, आंदोलनात सक्रिय सहभाग घेणे, अन्याय अत्याचाराच्या विरोधात धरणे आंदोलने मोर्चे निदर्शने व निवेदने देऊन प्रशासनाला जाब विचारणे, मागासवर्गीयांच्या अनेक न्याय मागण्या करता शासनाकडे पाठपुरावा करणे आदी त्यांच्या वीस वर्षातील कार्याची दखल घेऊन सदरील पुरस्कारासाठी त्यांची निवड करण्यात आली आहे. अवार्डमुळे सर्व स्तरातून त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Don`t copy text!