अशोक घोडके यांजकडून…
इंदापूर(वार्ताहर): तालुक्यातील पळसदेव- बिजवडी जिल्हा परिषद गटातील मांगुर माशाचे बेकायदेशीर तळे तात्काळ बंद करण्यात यावे अशी मागणी इंदापूर येथील सामाजिक कार्यकर्ते भैय्यासाहेब शिंदे यांनी केली आहे.
या वेळी बोलताना मांगुर मासा हा खाण्यास अपायकारक व आरोग्यास हानिकारक असल्याने मानवाच्या आरोग्यावर त्याचा विपरीत परिणाम होत असल्याचा निष्कर्ष काढण्यात आला असला तरी इंदापूर तालुक्यातील काही नागरिकांनी परप्रांतीयांना हाताशी धरून मांगुरची शेती करण्याचा सपाटा लावला आहे. उजनी धरण परिसरात इंदापूर तालुक्यात अनेक ठिकाणी बेकायदा शेती करण्याच्या प्रमाणात वाढ झाली आहे. यामुळे मांगुर ची मस्य शेती करणार्यांवर गुन्हे दाखल करण्याची मागणी शिंदे यांनी केली असून या संदर्भात लवकरच ते इंदापूर तहसील कार्यालयासमोर बेमुदत धरणे आंदोलन करणार आहेत.