बारामती(वार्ताहर : दाव्याचा अंतीम निर्णय होईपर्यंत अब्दुल समद खान यांनी दावा मिळकतीमधील रजा बेकरीमध्ये चालू असलेले बेकरीच्या पदार्थाचे उत्पादन थांबवावे अगर तिर्हाईत इसमांतर्फे बेकरीच्या पदार्थाचे उत्पादन करू नये असा आदेश मे.श्रीमती डी.एस.खोत न्यायालयाने दिलेला आहे.
रजा बेकरीचे मालक अब्दुल समद खान यांनी रहिवासी जागेमध्ये म्हणजे गुनवडी रोड वरील सावित्रानगर येथे बेकायदेशीर रजा बेकरी नावाने उत्पादन चालू होते त्याकामी त्यांचे शेजारी राहणारे आशपाक कमरूद्दीन शेख व अमीर आशपाक शेख यांनी संबंधीत शासकीय कार्यालयामध्ये तक्रारी दिलेल्या होत्या. त्याकामी बारामती नगर परिषदचे तत्कालीन मुख्याधिकारी यांनी रजा बेकरीचे चालू असलेले उत्पादन हे बंद करण्यासाठी वीज वितरण कंपनीला विद्युत जोड खंडीत करण्याचे पत्र दिले होते. त्याकामी श्री.खान यांनी बारामती येथील मे.कोर्टात दावा दाखल केलेला होता. त्यामध्ये आशपाक शेख व अमीर शेख यांना प्रतिवादी केलेले होेते. आशपाक शेख व अमीर शेख यांनी सदरील दाव्यामध्ये नि.नं. 43 ला वादी यांनी रजा बेकरीचे जनरेटरच्या सहाय्याने चालू असलेले बेकरीचे उत्पादन थांबवावे यासाठी तुर्तातुर्त ताकीदीचा अर्ज दिलेला होता. त्याकामी मे.कोर्टाने वादी व प्रतिवादी यांचे कागदपत्राची शहानिशा करून दोन्ही पक्षाचा युक्तीवाद ऐकून वरील प्रमाणे आदेश दिला.
सदर बेकरी चालविण्याकामी लावलेल्या जनरेटरच्या आवाजाच्या कंपनामुळे आशपाक शेख व अमीर शेख यांचे कुंटुंबियांच्या आरोग्यास धोका झाला, घुशीमुळे घराचा पाया कमकुवत झाला असुन माशांमुळेही त्रास होत होता आणि बेकरीच्या चिमणीमधून येणार्या राखेमुळेही त्यांचे आरोग्यास धोका निर्माण होत आहे. सदरील आशपाक शेख व अमीर शेख यांच्यातर्फे ऍड. शहानुर शफीर शेख यांनी काम पाहिले.
thanks..