वतन की लकीर (ऑनलाईन): बारामतीत दि. 15 मार्च 2021 रोजी दिवसभरात बारामती शहरातून 52 तर ग्रामीण भागातून 31 रुग्ण असे मिळून 83 कोरोना बाधित रुग्ण संख्या आढळून आले आहेत.
काल 327 जणांचे आरटी-पीसीआर नमुने घेण्यात आले होते त्यापैकी 64 रूग्ण पॉझिटिव्ह आढळून आले आहेत. एकही रुग्ण प्रतिक्षेत नसून, इतर तालुक्यात 09 रूग्ण पॉझिटीव्ह आढळून आले आहेत. 48 रुग्णांची ऍन्टीजन तपासणी करण्यात आली यामध्ये 13 रुग्ण पॉझिटिव्ह आढळुन आला आहे.
शहरातील काल दिवसभरात बारामतीत एकूण 83 रुग्ण पॉझिटिव्ह आढळून आले असल्याचे बारामती तालुका आरोग्य अधिकारी डॉ. मनोज खोमणे यांनी कळवले आहे. बारामतीत 7 हजार 669 रुग्ण असून, बरे झालेले 6 हजार 887 आहे तर मृत्यू झालेले एकशे एकोणपन्नास आहेत.
काल तालुक्यामध्ये खाजगी प्रयोगशाळेत आरटी-पीसीआर 28 जणांचे नमुने घेण्यात आले त्यापैकी 06 रुग्ण पॉझिटिव्ह आढळुन आले आहेत.