फीकी झाली छाया चंद्राची
तेज हरपले त्या भास्करचे,
कष्टमय अंधार नाहिसा झाला
मुख पाहता अशा तेजपुंजाचे.
आदर्श मानुनी त्या शिवराय
स्वराज्यासाठी त्यागिली काया,
मृत्युनेही मानली पराजय
असा मृत्युंजय शंभू अजय.
रयतचे रक्त वाचवण्या
तू तुझे रक्त वाहिले,
धर्मरक्षणार्थ तू स्वतःचे
प्राणदेखील अर्पिले,
भीमा इंद्रायणीचा तो संगम
तुझ्या रक्ताने रंगीत झाला,
अमर बलिदानाने धर्मप्रेमाने
संगमेश्वर काठ पावन झाला.
असा जनपालक तु स्वराज्यधर्म रक्षिला
शिवपोटी शिवपुत्र म्हणून जन्मला,
रौद्रशंभूने तुळापूरी देह ठेविल
ऐसा मृत्युंजय एकचि जाहला.
- सार्थक जाधव, बारामती
मो.8459079015