अशोक घोडके यांजकडून…
इंदापूर(वार्ताहर): दीर्घकाळ सुरू असलेल्या शेतकरी आंदोलनावर केंद्र सरकार कोणताही तोडगा काढीत नसल्याने वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष ऍड. प्रकाश तथा बाळासाहेब आंबेडकर यांच्या आदेशानुसार या आंदोलनाच्या समर्थनात व कृषि कायदा रद्द करणेसाठी संपूर्ण महाराष्ट्रात प्रत्येक तहसिल कार्यालयावर उपोषणाबाबत केलेल्या सुचनांनुसार इंदापूर तहसिल कार्यालयासमोर उपोषण करण्यात आले.
यावेळी हनुमंत कोकाटे, हनुमंत कांबळे, माऊली नाचण, सागर लोंढे, हनुमंत बनसोडे, प्रमोद चव्हाण, गिरिष मदन पाटील, किरण मिसाळ, राणी कोकाटे, दत्तात्रय घोडके, भाऊसो सोपान शिंदे, अजिनाथ शिंदे, निहाल गायकवाड यांनी एकदिवसीय लाक्षणिक उपोषण करून शेतकरी आंदोलनास समर्थन दर्शविले.