अशोक घोडके यांजकडून…
गोतंडी(वार्ताहर): ग्रामपंचायत गोतंडीच्या वतीने क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या स्मृतिदिनानिमित्त ग्रामपंचायत कार्यालयात प्रतिमेस पुष्पगुच्छ अर्पण करून अभिवादन करण्यात आले. यावेळी गोतंडीचे सरपंच गुरूनाथ नलवडे, उपसरपंच परशुराम माधव, सदस्य बिभीषण नलवडे, सुनिल कांबळे, महेश पवार, संजय बिबे, किशोर कांबळे, छगन शेंडे, यशवंत पाटील, अनिल खराडे, बाळु बनसोडे, बापु पिसे, हौसेराव यादव इ.मान्यवर उपस्थित होते. यावेळी बहुसंख्य ग्रामपंचायत सदस्य व ग्रामस्थ उपस्थित होते.