बारामती(वार्ताहर): बारामती कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सभापतीपदी पारवडी गावाचे वसंत बाबुराव गावडे तर उपसभापतीपदी सोनकसवाडीचे दत्तात्रय गणपत सणस यांची निवडीची घोषणा राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचे तालुकाध्यक्ष संभाजी होळकर यांनी केली.
बारामती कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सभापती व उपसभापती पदासाठी झालेल्या संचालक मंडळाच्या बैठकीमध्ये राज्याचे उपमुख्यमंत्री ना.अजित पवार यांचे आदेशानुसार सदरची निवडणूक बिनविरोध करण्यात आली.
यावेळी मावळते सभापती अनिल खलाटे, उपसभापती बाळासाहेब पोमाणे, बारामती तालुका दूध संघाचे चेअरमन संदीप जगताप, पंचायत समितीचे प्रभारी सभापती प्रदीप धापटे, पंचायत समिती मा.सभापती सौ.निता बारवकर, कृषी उत्पन्न बाजार समितीचे सचिव अरविंद जगताप, व्यापारी असोसिएशनचे अध्यक्ष महावीरशेठ वडूजकर, निवडणूक निर्णय अधिकारी श्री.कुंभार तसेच इतर कार्यकर्ते व पदाधिकारी उपस्थित होते.