अशोक घोडके यांजकडून….
गोतोंडी(वार्ताहर): पुणे जिल्ह्यामध्ये महसूल विभागामार्फत गॅस असल्यास शिधापत्रिका रद्द या या महसूली हमीपत्राच्या विरोधात वेळ पडल्यास आंदोलन करणार असल्याचे लोक जनशक्ती पार्टी युवाचे पश्र्चिम महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष भैय्यासाहेब शिंदे यांनी एका पत्रकाद्वारे कळविले आहे.
सध्या शिधापत्रिका तपासणी मोहिम सुरू आहे. शिधापत्रिका धारकांकडून शिधापत्रिका तपासणी नमुना नावाचा फॉर्म भरून घेतला जात आहे. हे सर्व फॉर्म वाटप करून 50 टक्के फॉर्म भरून घेतलेले आहेत. शिधापत्रिकाधारक, शिधावाटप दुकानदार व नायब तहसीलदार जिल्हा पुरवठा अधिकार्यांनी सुद्धा या फॉर्म मधील हमीपत्र वाचलेले दिसत नाही. लोकांनी सुद्धा हमीपत्रावर सही अंगठ्यांचा ठसा करून फॉर्म भरून दिले आहेत.
या फार्म वरील हमीपत्र खालील प्रमाणे ….’’मी हमीपत्र लिहून देतो की माझ्या किंवा माझ्या कुटुंबातील कोणत्याही व्यक्तींच्या नावाने गॅस कनेक्शन असेल तर माझे रेशन कार्ड रद्द करण्यात येईल हे मला माहित आहे. अशाप्रकारे हमीपत्र लिहून घेतले जात आहे हे शासनाचे चुकीचे धोरण असून यांच्याविरोधात वेळपडल्यास आंदोलन करावे लागेल असेही शिंदे यांनी सांगितले. जिल्ह्यातील राजकीय पक्ष, सामाजिक संघटना, आरटीआय कार्यकर्ते यांनी आपल्या पद्धतीने जिल्हाधिकारी यांना निवेदन देऊन आंदोलने करावी व रेशन कार्ड तपासणी नमुना योग्य तो बदल करावा. या मागणीसाठी विनंती करावी आपण त्या हमीपत्र फॉर्म वर कोणत्याही प्रकारची सही अथवा करू नये असेही आवाहन त्यांनी केले आहे.