नटराजचा हात…

बारामती तालुक्यात कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यामध्ये नटराज नाट्य कला मंडळाचा खुप मोठा हात आहे हे कोणीही नाकारू शकत नाही. सध्या वाढता प्रादुर्भावापुर्वी कोरोना रूग्णांना कोवीड केअर सेंटरच्या माध्यमातून कौटुंबिक नात्याने सेवा देण्याचा प्रयत्न केला. यामुळे रूग्णांना आजारापेक्षा आपलेसे कोणीतरी जवळ असल्याचा अनुभव आला.

कोरोनाचा विषाणू अंगी जडल्यानंतर पोटचे पोर सुद्धा दूर करावे लागते. काहींना तर कोरोनाच्या भितीमुळे आपले प्राण गमवावे लागले. या काळात नटराज टीमने तन-मन व धनाने रूग्णांची सेवा केली. त्यांना आपण आपल्या कुटुंबियांपासून खूप लांब, दुर्गम व निरागस ठिकाणी गेलो आहोत असे वाटले नाही. सध्या बारामती तालुका शहरामधील कोरोनाग्रस्तांची संख्या वाढत आहे. आता घरी राहुन उपचार घेता येणार नाही. सौम्य लक्षणे असलेल्या रूग्णांनी शासकीय रूग्णालयाशी संपर्क साधुन कोविड केअर सेंटर मध्ये उपचार घेणे आवश्यक आहे. नटराज नाट्य कला मंडळाने संचलित केलेल्या दोन्ही सेंटरमध्ये उपचार देण्याचा प्रयत्न करीत आहेत.

नटराजच्या कामाची दखल घेत प्रशासनाने नटराजच्या सदस्यांना लसीकरण करण्याची मोहिम राबविली. यामध्ये बहुतेक सदस्यांनी पहिला डोस घेऊन दुसर्‍या डोसच्या प्रतिक्षेत आहेत. निस्वार्थपणे रूग्णांची केलेली सेवा त्याची दखल प्रशासनाने घेतली ही जमेची बाजु नटराजची आहे. पुरग्रस्तांच्या मदतीसाठी सुद्धा नटराजने धाव घेतली. गोर-गरीबांना कपडे, धान्य देवून त्यांची मदत केली. एवढं मोठे सामाजिक कार्य करीत असताना, अजुनही काही बिनकामी, निकर्मी, बाजारबुनगे लोकं काही चांगले वाईट झाले तर सहज बोलतात नटराजचा हात असेल. आज कोविडचा प्रादुर्भाव कमी करण्यामध्ये नटराज ने जे पाऊल उचलले व उचलीत आहे त्याबाबत कोणी म्हणत नाही की, रूग्ण कमी करण्यामध्ये नटराजचा हात आहे.

काहींची मालमत्ता एवढी आहे की, तीन पिढ्या बसून खाल्ले तरी संपता संपणार नाही. मात्र, या लोकांच्या खिश्यातून सोडा खाली पडलेला एक रूपया सुद्धा सुटत नाही. म्हणे आम्हाला राजकीय, सामाजिक पार्श्र्वभूमी आहे. कोट्यावधी रूपयांच्या उधार्‍या ठेवून बुडविण्याच्या प्रयत्नात असणार्‍यांशी बारामतीकरांनी कोणती अपेक्षा ठेवावी. या लोकांबरोबर तीन पिढ्यांचे संबंध असणारे तुटत असतील तर काय कमविले व काय गमविले याचा विचार करण्याची गरज आहे. मतभेद, जातीवाद करण्यामध्येच यांचे जीवन व्यथित चालले आहे.

नटराज व नटराजच्या पदाधिकार्‍यांनी पक्षाचे किंवा एखाद्या सामाजिक कार्यासाठी जमा केलेल्या पैश्यातून आम्ही केले म्हणून कधीही टिमकी वाजवली नाही. उलट, समाजाचे घेऊन समाजाला दिले तेही सर्व तळागळातील घटकांपर्यंत उलट कमी पडले तर नेत्यांना सांगून आणखीन भर टाकून दिले. नटराजचा सामाजिक कार्यातील आदर्श घ्यावा तेवढा कमीच आहे. यांचेकडून कोणता सामाजिक उपक्रम राबवायचा म्हटला तर एक रिक्षावाला, सहा आसनी रिक्षा वर्गणीतून सुटत नाही. अन्यथा दुसरीकडे जावून धंदा करायचा असा यांचा भावनिक दम असतो.

बारामतीच्या सामाजिक व राजकीय क्षेत्रात असे होऊन बसले आहे की, चांगले झाले की आम्ही केले आणि काही वाईट झाले तर यामध्ये नक्कीच नटराजचा हात असेल असे म्हटले जावू लागले आहे. त्यामुळे बोलणार्‍याचे तोंड दाबता येत नाही पण मन परिवर्तन करण्याचे काम सध्या नटराजच्या पदाधिकार्‍यांकडून होत आहे. मन तोडण्यापेक्षा मने जिंकण्याचा प्रयत्न केला पाहिजे. आज वाढती रूग्ण संख्येचा आढावा घेत तातडीने कोविड केअर सेंटर सुरू केले. एवढी तत्परता आपतकालीन मध्ये नटराजची असेल तर नक्कीच बारामतीकरांसाठी ज्याप्रमाणे साहेब, दादा व ताईंचे राजकीय, सामाजिक कार्य आहे त्या जोडीला नटराजचे नाव घेतले तर वावगे ठरू नये.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Don`t copy text!