मौल्यवान वस्तु व रोकड असलेली पर्स केली परत! मोहसीन इनामदार यांचे सर्वत्र कौतुक

बारामती(वार्ताहर): स्वत:च्या दुचाकी वाहनाला अडकविलेली पर्स सापडली. पर्समधील मौल्यवान वस्तु व रोकड पाहता या युवकाचा प्रामाणिकपणा ढळला नाही. बारामती शहर पोलीस स्टेशनमध्ये सदरची पर्स जमा केली.

                मोहसीन महंमदभाई इनामदार (रा.कसबा, बारामती) या प्रामाणिक युवकाचे नाव आहे. 31 ऑगस्टला मोहसीन दुपारचे वेळी कामानिमित्त इंदापुर रोडला गेले असता. त्याच्या मालकीच्या दुचाकीच्या हँडेलला गुलाबी रंगाची लेडिज पर्स आढळुन आली. मोहसीनने  काही वेळ वाट पाहिली मात्र पर्सचे मालक आले नाही पाहुन बारामती शहर पोलीस स्टेशनला जमा केली. याबाबत बारामती शहर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक औदुंबर पाटील यांना सदर घटनेबाबत सांगितले असता त्यांनी त्वरीत संबंधित गावचे पोलीस पाटील यांना फोन करुन सर्व घटना सांगितली. पोलीस पाटील यांनी ज्या महिलेची पर्स आहे.त्यांना संपर्क साधला. सदर पर्स त्या महिलेच्या स्वाधिन करण्यात आली. या प्रामाणिकपणामुळे  मोहसीनचे सर्वत्र कौतुक होत आहे. मोहसीन इनामदार हे सतत सामाजिक कार्यात सक्रीय असतात.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Don`t copy text!