नटराज नाट्य कला मंडळातर्फे कोव्हीड सेंटरचे व्यवस्थापन

सेंटरमध्ये चहा-नाष्टा, भोजन, औषधे व करमणूकीसाठी टी.व्ही. केबलचा समावेश

बारामती(वार्ताहर): सामाजिक क्षेत्रात उल्लेखनिय कार्य करणार्‍या नटराज नाट्य कला मंडळ बारामती या संस्थेच्या वतीने डॉ.बाबासाहेब आंबेडकर विद्यार्थी वसतीगृह, इंदापूर रोड येथील कोव्हीड सेंटरचे व्यवस्थापन केले जाणार आहे.

                बारामती तालुका व शहरामधील कोव्हीडचे पॉझिटीव्ह रूग्णामधील लक्षणे नसलेले (असिमटेमेटीक) रूग्ण या ठिकाणी भरती केले जाणार आहेत. याठिकाणी 100 बेडची व्यवस्था असून, स्वच्छतागृह, भोजनकक्ष, करमणूकीसाठी हॉल इ. व्यवस्था करण्यात आली आहे. डॉक्टरांकडून पाठविलेल्या रूग्णास दाखल करून घेताना येथे उभारल्या जाणार्‍या सुविधा केंेद्रामध्ये रूग्णाची नोंदणी प्रथम केली जाणार आहे. दररोज  तीन वेळा रूग्णांची तपासणी, डॉक्टरांकडून केली जाणार आहे. रूग्णास चहा-नाष्टा, भोजनाची सोय केली जाणार असून दिवसातून तीन वेळा रूग्णास देणेची  औषधे स्वयंसेवक देणार आहेत. रूग्णास श्र्वसनाचा त्रास होवू लागला तर त्यास पुढील उपचाराकरीता इतरत्र नेवून सोडणेची व्यवस्था करण्यात आली आहे. करमणूकीकरीता हॉलमध्ये केबल टि.व्हीची सोय करण्यात आली आहे.

                रूग्णाबाबत पूर्णपणे काळजी घेवून उपचारावर देखरेख ठेवली जाणार आहे. हे केंद्र शासनाच्या वतीने सुरू राहणार असून त्याच्या व्यवस्थापनाची जबाबदारी नटराज संस्थेने घेतली असल्याची माहिती संस्थेचे अध्यक्ष किरण गुजर यांनी दिली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Don`t copy text!